शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी प्रभागात समस्या ‘जैसे थे’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:48 IST

पंचवटी प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाला तरी पंचवटी प्रभागातील नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपालाच घरचा अहेर दिला.

पंचवटी : पंचवटी प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाला तरी पंचवटी प्रभागातील नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपालाच घरचा अहेर दिला.  पंचवटी प्रभाग समितीची यंदाच्या वर्षातील शेवटची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या, अनियमित घंटागाडी, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी बदललेली नाही अशा विविध तक्रारी मांडून सभापती भाजपाच्या असल्या तरी तसेच सभापतींचा कार्यकाल पूर्ण होत आला असतानाही समस्या सुटलेल्या नसल्याची खंत मांडून एकप्रकारे भाजपाच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत गेल्या महिन्यात झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करावे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून पंचवटी विभागात प्रभारी उद्यान निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या राहुल खांदवे यांचा अनुभव बघून त्यांची पंचवटी उद्यान निरीक्षकपदी नियुक्ती करावी असा ठराव मांडण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत माने यांनी संबंधित विभागाने नगरसेवकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडविण्याचे काम करावे, अशा सूचना मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या. यावेळी झालेल्या बैठकीत नगरसेवक शीतल माळोदे, पूनम मोगरे, प्रा. सरिता सोनवणे, पूनम धनगर, मिच्छंद्र सानप, सुरेश खेताडे, नगररचना विभागाचे दौलत घुगे, आर. एम. शिंदे, वसंत ढुमसे, बांधकामचे नितीन पाटील, आरोग्याचे संजय दराडे आदी उपस्थित होते.सभागृहात पुन्हा झेरॉक्स नगरसेवकगुरु वारी (दि. २१) पंचवटी प्रभाग समितीची यंदाच्या वर्षातील शेवटची सभा सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सत्ताधारी भाजपा नगरसेवकांची कामे करणाºया झेरॉक्स नगरसेवकांनी पुन्हा एकदा सभागृहात प्रवेश मिळवून बैठकीत ठिय्या मांडला होता. कोणतेही पद नसताना केवळ झेरॉक्स नगरसेवक म्हणून सभागृहात प्रवेश करणाºयांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. गुरु वारी झालेल्या बैठकीत झेरॉक्स नगरसेवकांपाठोपाठ त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सभागृहात बैठकीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका