शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन शाळा संकल्पनेला ग्रामीण भागात समस्यांचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:34 IST

मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या समस्या आज आ वासून उभ्या आहेत.

मालेगाव : जागतिक महामारी कोरोना संपूर्ण जगावर अस्मानी संकट घेऊन आलेला असताना गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता आॅनलाइन ही नवीन शाळा विद्यार्थी- पालकांना खुणावत आहे. शहरी विद्यार्थी व ग्रामीण विद्यार्थी यांच्या वेगवेगळ्या समस्या आज आ वासून उभ्या आहेत. ग्रामीण भागात आॅनलाइन शिक्षण कसे शक्य होईल याचीच चिंता लागली आहे .ग्रामीण भागात शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांच्याही समस्या वेगळ्या आहेत. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारे अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल याचीच वानवा असल्याने टॅब, संगणक, लॅपटॉप यांचा विषयच नाही. दूरदर्शन जरी असले तरी विजेची समस्या आहेच. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणारी आवश्यक उपकरणे, इंटरनेट यांचा अतिरिक्त खर्च, उपलब्ध नसणारी रेंज याही समस्या आहेतच. ग्रामीण भागातील पालकांच्या घरात शिक्षण घेणारी मुलं एकापेक्षा अधिक असल्यास तेथे नियोजन करणे अवघड जाणार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना संपूर्ण आॅनलाइन शिक्षण मिळाल्यास शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया कशी होणार, त्यांचे मूल्यमापन, त्यांना कोणता घटक समजला, नाही समजला त्यांच्याकरिता काय उपाययोजना आहेत याविषयीही पालक अनभिज्ञ आहेत. ज्यांच्याकडे ही साधनेच नाहीत त्यांच्यापर्यंत शिक्षण कसे पोहोचावे याचे नियोजन करावे लागणार आहे.पालकांनी पाल्याजवळ बसून आॅनलाइन अभ्यास पूर्ण करून घेणे अपेक्षित असताना शेतीची वा इतर कामे सोडून ते कसे शक्य आहे या चिंतेत सध्या पालक आहे. दोन, तीन महिने अजून शाळा नाही भरल्या तरी हरकत नाही, पण आॅनलाइनच्या कचाट्यात इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांना आम्ही टाकू शकत नाही. मानसिक आरोग्यास हानी पोहोचणार नाही याची हमी कोण घेणार आहे? असेही पालक विचारत आहेत.------------------------विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार होत आहे, पण आॅनलाइन शिक्षणाकरिता योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण पालकांचे होणे गरजेचे आहे. कोरोना पार्श्वभूमीवर पालक आज पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार देत आहेत तसेच आॅनलाइन शिक्षणाचेही योग्य समुपदेशन होऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचेल, हे येणारा काळच ठरवेल.- भरत पाटील,उपक्रमशील शिक्षक, मालेगाव

टॅग्स :Nashikनाशिक