शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी वसाहतीतील समस्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:29 IST

जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सिडको : जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमधील बंद अवस्थेत असलेल्या शौचालयात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.जुने सिडको येथील इंदिरा गांधी वसाहत क्रमांक एकमध्ये तीन हजारांहून अधिक रहिवासी राहात असून, येथील रहिवासींना महापालिकेकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवासींकडून करण्यात येत आहे. याठिकाणी रहिवासी राहात असलेल्या ठिकाणी जुने शौचालय गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, या शौचालयात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. सदरचा कचरा मनपाकडून उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या घाण असलेल्या परिसराच्या बाजूला रहिवासी राहत असल्याने याचा त्यांना त्रास होत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.घंटागाडी येथील नागरिकांचा दैनंदिन कचरा उचलत असले तरी बंद शौचालयातील कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच यामुळे डासांचे प्रमाणाही वाढले असून, महापालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जुने शौचालय बंद करून मनपाने याठिकाणी दुसऱ्या जागेत नवीन शौचालय तयार केले असले तरी नवीन शौचालयाचीदेखील दुरवस्था झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. एकूणच महापालिकेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी अपेक्षा रहिवासींनी केली आहे.जुने शौचालय असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कचरा उचलला गेला नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याच परिसरात लहान मुलंदेखील खेळत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, मनपाने याबाबत त्वरित दखल न घेतल्यास मनपाच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार.- शरद जाधव, शहराध्यक्ष, अखिल महा. वडार समाज संघटना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका