शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:58 AM

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा लाभ उठविण्याची शक्यता आहे.

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपतर्फे भोपाळमधून उमेदवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद मालेगाव शहरात उमटले. भाजपच्या या निर्णयामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांची अडचण झाली असून, कॉँग्रेस त्याचा लाभ उठविण्याची शक्यता आहे.मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीने कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगाव मध्य मतदार संघात मुस्लीम मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. त्याचा फायदा साहजिकच धुळे लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस-राष्टÑवादी महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांना होण्याची शक्यता आहे.धुळे लोकसभा निवडणुकीसाठी मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य अशा दोन्ही मतदारसंघात मिळून २ लाख १४ हजार ७५ मतदार आहेत. मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात एकूण १ लाख ३ हजार ४०१ मतदार असून, त्यात ४९ हजार ८७६ पुरुष आणि ५३ हजार ५२५ महिला मतदारांचा समावेश आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात १ लाख १० हजार ६७४ मतदार असून, त्यात ५४ हजार ६१८ पुरुष आणि ५० हजार ५६ महिला मतदारांचा समावेश आहे. मालेगाव मध्य मतदारसंघातील मतदार नेहमीच कॉँग्रेस सोबत राहिला आहे. प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीने स्थानिक निवडणुकीची समीकरणे बदलणार असून, काही प्रमाणात मध्य मतदारसंघातून भाजपबरोबर जाणारे अत्यल्प मतदानही आता भाजपपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मालेगाव बाह्य मतदारसंघात ग्रामीण भागात असलेला मुस्लीम मतदारदेखील भाजपपासून दूर जाऊन त्यांचे मतदान कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता वाढली आहे.जामिनावर मुक्ततामालेगावी २९ सप्टेंबर २००८ रोजी भिक्कू चौकात बॉम्बस्फोट झाले होते. त्यात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांना बॉम्बस्फोटाच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती खालावल्याने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.उमेदवारीला देणार आव्हानसध्या लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्याचा लाभ उठविण्यासाठी भाजपने प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून तिकीट देऊन निवडणूक मैदानात उतरविल्याने मालेगावातील बॉम्बस्फोटात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाइकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रज्ञासिंह यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीस आव्हान देत त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात बॉम्बस्फोटातील पीडितांचे नातेवाईक उच्च न्यायालयात धाव घेऊन पीटिशन दाखल करणार असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMalegaonमालेगांव