शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात मतदान केले तर मिळणार बक्षीस, टीव्ही आणि सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 16:32 IST

नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकय यंत्रणा आणि नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान केल्यानंतर संबंधित मतदाराला टीव्हीपासून अन्य भेटवस्ती तसेच वैद्यकीय चाचण्या आणि कपडे खरेदीसाठीदेखील सवलती देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर एक सलून व्यावसायिक मतदान करणाऱ्यांना दाढी कटींग मध्ये पन्नास टक्के सवलत देणार आहे.

ठळक मुद्देव्होट कर नाशिककरटक्का वाढविण्यासाठी योजनाकपडे खरेदी, सलूनमध्येही सुट

नाशिक : मतदानाचा टक्का वाढणे हे जागरूक लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासकय यंत्रणा आणि नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्न करीत असताना व्यावसायिकदेखील त्यासाठी सरसावले आहेत. मतदान केल्यानंतर संबंधित मतदाराला टीव्हीपासून अन्य भेटवस्ती तसेच वैद्यकीय चाचण्या आणि कपडे खरेदीसाठीदेखील सवलती देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर एक सलून व्यावसायिक मतदान करणाऱ्यांना दाढी कटींग मध्ये पन्नास टक्के सवलत देणार आहे.

मतदानाचा हक्क पवित्र असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांना जाणीवपूर्वक मतदान करण्याचे आवाहन करावे लागते. अनेकदा मतदारांची इच्छा असते परंतु कंटाळा, सुटीचा दिवस असल्याने मौजमजा आणि अनास्था यामुळे अनेकदा मतदार मतदान करत नाहीत. मात्र, मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा यांच्यासह काही संस्थादेखील एकत्रित प्रयत्न करीत असून, ‘व्होट कर नाशिककर’ अशी मोहीम सुरू आहे. त्याला शहरासह जिल्ह्यातील काही व्यावसायिकांनीदेखील साथ दिली आहे. अनेक व्यावसायिकांनी बक्षिसे, सवलत योजना आणि सोडत पद्धतीने भेटवस्तू देण्याची योजनाही जाहीर केल्या आहेत.

पंचवटीतील एका व्यावसायिकाने मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या दुकानात मतदारांनी नोंद केल्यास दुसºया दिवशी (मंगळवारी) सोडत पद्धतीने एका भाग्यवान मतदाराला टीव्ही भेट देण्याची योजना घोषित केली आहे. देवळा आणि लोहोणेर कार्यक्षेत्र असलेल्या एका पतसंस्थेच्या वतीने मतदानानंतर या पतसंस्थेकडे नाव नोंदविणा-या शंभर भाग्यवान मतदारांना बक्षिसे देण्यात येणार आहे. नाशिक शहरात कॉलेजरोड भागातील एका ब्युटीकच्या वतीने मतदान केल्याची खूण दाखविल्यास ग्राहकाला शिलाई त्याचप्रमाणे ड्रेस मटेरियल, रेडिमेड कपडे यावर ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे.

जुन्या सिडकोत एका पॅथॉलॉजिकल लॅबने सोमवारी (दि.२१) मतदान केल्यानंतर याठिकाणी कोणत्याही प्रकाराच्या आरोग्य तपासणीवर तब्बल ४० टक्के इतकी सूट देण्यात येईल, अशी योजना जाहीर केली आहे. कॉलेजरोडवरील एका आइस्क्रिम पार्लरने कोणत्याही प्रकारचे आइस्क्रिम घेतल्यास तीस टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना घोषित केल्या जात असतानाच सलून व्यावसायिक मागे नाही. पंचवटीतील एका सलून व्यावसायिकाने मतदान करून येणाºया मतदारास दाढी आणि कटिंग केल्यास ५० टक्के सूट देण्याचे जाहीर केले आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान