मुलांमधील कलागुण जगासमोर आणण्यासाठी अभिरंग बाल कला संस्था चांगले उपक्रम राबवित असते. यामध्ये मुलांचा जास्तीत जास्त सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी आपापल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन भुजंग यांनी केले. किल्ले बनवा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यात सहभागी झालेल्या बालगोपाळांनी किल्ल्यांच्या उत्कृष्ट प्रतिकृती तयार केल्या. परीक्षक म्हणून रवींद्र धारणे व संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन किल्ल्यांची पाहणी केली. संस्थेचे संचालक अंबादास जोशी, माधव भुजंग, सुधीर शिखरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:48 IST