शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधीमुळे कॉँग्रेसचा जनाधार वाढणे अशक्य : जाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:28 IST

कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.

नाशिक : कॉँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या प्रियांका गांधी यांच्यामुळे भाजपाला फरक पडणार नाही. केवळ गांधी परिवारात आणखी एक सदस्य राजकारणात सक्रिय झाला, या पलीकडे त्याला महत्त्व नसल्याचे सांगत भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कॉँग्रेसवर टीका केली. सध्या भाजपा-सेनेत युतीच्या चर्चा झडत असल्याने या विषयावर त्यांनी न बोलणेच पसंत केले.भाजपाच्या वतीने मन की बात, मोदी के साथ या जाहीरनाम्यात लोकांच्या सूचना समावेश करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी (दि. ११) वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असून, पंतप्रधान ठरविण्याची क्षमता असलेले राज्य आहे. परंतु कॉँग्रेसची सत्ता येथून केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता प्रियांका गांधी कॉँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या तरी त्यांच्या पक्षाला जनाधार मिळणार नाही, असेही ते म्हणाले. विरोधकांच्या महाआघाडीविषयी बोलताना ज्यांचा नेता एक नाही, सूत्र एक नाही किंवा अजेंडाही एक नाही, असे सर्व एकत्र आले आहेत. सत्तेसाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी एकमेकांच्या विरोधात लढले आहेत. तेथे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात हे एकत्र आले असून, नागरिकांना हे सर्व माहिती असल्याने त्याचा परिणाम होणार नसल्याचेही जाजू म्हणाले.राज्यात युतीची चर्चा होत आहे. १९८४ पासूनची भाजपा-शिवसेनेची मैत्री आहे. मात्र त्याबाबत पक्षाची संसदीय समिती निर्णय घेईल, असे सांगतानाच उत्तर महाराष्टÑातील काही जागांवरून सुरू असलेल्या रस्सीखेचीबाबतदेखील समितीच निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, माजी शहराध्यक्ष विजय साने, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा