शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षिततेची साधने नसल्याने खासगी रुग्णालये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:50 IST

विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देआयएमएचा दावा : मास्कसह अनेक साधनांचा काळाबाजारप्राप्त परिस्थितीत सुरक्षित वैद्यकीय उपकरणे नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक अगतिक झाले असतानाच शहरात नव्हे तर राज्यात अनेक खासगी रुग्णालये आणि दवाखाने बंद झाले आहेत. शासन आणि प्रशासन याबाबत वैद्यकीय व्यावसायिकांना कारवाईचे इशारे देत असले तरी सद्यस्थितीत आवश्यक असलेली पीपीइ म्हणजे प्रायव्हेट प्रोटेक्शन इक्युपमेंट उपलब्ध होत नसल्याने रुग्णालये बंद ठेवण्याची वेळ आल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे एन-९५ मास्कचा नाशिकमध्ये काळाबाजार सुरूच असून, दोनशे ते अडीचशे रुपये मोजूनही मास्क मिळत नाही, त्यामुळे दवाखाने कसे काय सुरू ठेवणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यापासून राज्य शासनाने विशेष दक्षता घेताना नियमित ओपीडी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक दवाखाने आणि रुग्णालये बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मनपा आणि अन्य शासकीय रुग्णालयांवर रुग्णांचा भार वाढल्याने मध्यंतरी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली होती. मात्र, या संदर्भात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या वेगळ्याच अडचणी पुढे आल्या आहेत.नाशिकमध्येच नव्हे तर राज्यात बहुतांशी रुग्णालयात आणि वैद्यकीय व्यावसायिकांकडे प्राप्त परिस्थितीत सुरक्षित वैद्यकीय उपकरणे नाहीत. कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफला एन-९५ मास्क, जंतू संसर्गापासून सुरक्षित असणारे गाउन्स आणि हॅण्ड ग्लोज, हॅण्ड सॅनिटायझर नाहीत. नाशिकच्या बाजारात तर एरव्ही-१३० रुपयांचा असणारा एन-९५ मास्क २०० ते २५० रुपयांना आहे, पण तरीही तो उपलब्ध होत नाही. या संदर्भात शासनाने काळाबाजार रोखून अतिरिक्त मास्क तसेच सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याचे आदेश कुचकामी ठरले आहेत. कोणताही रुग्ण आल्यानंतर तो कोरोनाचाच रुग्ण आहेत हे तपासणी शिवाय कळणार नाही, पण असा एकदा रुग्ण आला तर त्याच्यापासून बचावण्यासाठी म्हणजेच जंतू संसर्ग टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधने नाहीत केवळ डॉक्टर नव्हे तर त्यांच्याकडील पॅरा मेडिकल स्टाफसाठीसुद्धा कोणत्याही प्रकारची साधने नसतील तर दवाखाने कशी काय सुरू ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक