शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे पळालेल्यांना अभय, सहकार्य करणा-यांना तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 19:08 IST

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ध्वनीफितीचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचे व कारभाराचे विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही कारणावरून बदनाम करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला आहे.

ठळक मुद्देजयंत पाटील : धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्नमुंडे यांच्यावरील आरोपाने राष्टÑवादीला काही नुकसान नाही,

नाशिक : देशात कोणतीही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध होण्याअगोदर केंद्र व राज्य सरकारकडून संबंधितांना तुरुंगात डांबले जाते. राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात तर कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही, असे असतानाही गेल्या २२ महिन्यांपासून त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे. भुजबळ यांनी चौकशीत सर्व प्रकारचे सहकार्य केलेले असूनही कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करणारा नीरव मोदी याला परदेशात पळून जाण्यासाठी मदत करण्याचे तर चौकशीत सहकार्य करणाºया भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचा उद्योग सरकारने सुरू केल्याचा आरोप माजी वित्तमंत्री आमदार जयंत पाटील यांनी केला आहे.नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील कथित ध्वनीफितीचाही उल्लेख केला. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराचे व कारभाराचे विविध प्रश्न उपस्थित करून भंडावून सोडले आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही कारणावरून बदनाम करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला आहे. मुंडे यांनी या संदर्भात आपली बाजू मांडली आहे व त्यांनी स्वत:च चौकशीची तयारी दर्शविली आहे. या सा-या प्रकरणात विधीमंडळालाच आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आल्यामुळे राष्टÑवादीचे आमदार हेमंत टकले यांनी हक्कभंगाची सूचना दिली आहे. त्यामुळे मुंडे यांच्यावरील आरोपाने राष्टÑवादीला काही नुकसान सोसावे लागणार नाही, असेही पाटील म्हणाले. सरकारची सहनशीलता संपली आहे. त्यामुळे जो घटक वा व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलेल त्याच्या मागे सरकार लागते हे यानिमित्ताने सिद्ध झाले असे सांगून २००७ मध्ये दहा लाख रुपये लाच घेतल्याच्या प्रकरणात दहा वर्षांनी कार्ती चिदंबरम् याला आत्ताच अटक कशी? असा सवालही त्यांनी केला. टू जी स्कॅमबाबतदेखील अशाच प्रकारे घोटाळा सिद्ध होण्यापूर्वीच अटक करण्यात आली व तुरुंगात डांबण्यात आले, परंतु न्यायालयात ते निर्र्दाेष ठरले त्यामुळे त्यांचे तुरुंगातील आयुष्य कोण परत करेन, अशी विचारणाही पाटील यांनी केली.विधीमंडळात प्रश्न विचारण्यासाठी पैसे दिले-घेतले जातात काय? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी नकार दिला. ते म्हणाले सदस्यांकडून विचारले जाणा-या प्रश्नांची विगतवारी आॅनलाइन होते, त्यामुळे त्यात कोणता प्रश्न घ्यायचा हे ठरविण्याचे अधिकार अध्यक्षांना असल्याने ते शक्य नसल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक