शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

आधी सर्वेक्षण, मग लाभाची चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:22 IST

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे नगररचना योजना (टीपी स्कीम) राबवून तेथे नियोजनबद्ध नगरी वसविण्याच्या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांनी अनेक प्रश्न विचारून स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांची कोंडी केली. शेतकºयांना पूर्वकल्पना न देता महासभेत हा विषय मांडलाच कसा, असा प्रश्न करीत विविध मागण्यांची सरबत्ती केली. विशेषत: अधिक लाभ का देत नाही तसेच वाढीव चटई क्षेत्र किती देणार, असा प्रश्न केल्यानंतर प्रशासनाने प्रस्तावित योजनेसाठी आधी सर्वेक्षण करू द्या मग लाभ किती मिळू शकतो याची पडताळणी करून लाभ किती मिळू शकतो हे सांगता येईल, असेच उत्तर शेतकºयांना देण्यात आले. अखेरीस शेतकºयांना सर्वेक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक बोलावू असे सांगण्यात आले तर कंपनीने सर्वेक्षण केल्यानंतर तीन महिन्यांत सर्व पडताळणी करून शेतकºयांना किती जमीन मिळेल किंवा वाढीव फायदे मिळतील याबाबत माहिती देऊ शकू, असे सांगण्यात आले.मौजे नाशिक आणि मौजे मखमलाबाद शिवारात सुमारे सव्वासातशे एकर क्षेत्रात नगर रचना योजना आणि नंतर खास नियोजनबद्ध नगरी वसविण्याची स्मार्ट सिटी अंतर्गत योजना असून, त्यासंदर्भात बुधवारी (दि. १२) स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल तसेच नगररचनाकार कांचन बोधले यांनी महाकवी कालिदास कला मंदिरात सादरीकरण केले. यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडकेदेखील उपस्थित होत्या.मौजे नाशिक शिवारातील ५४ तर मखमलाबाद येथील वीस अशा ७४ सर्व्हे क्रमांकावर एकूण ७५४ एकर क्षेत्रात महापालिका खास नियोजनबद्ध शहर वसविणार आहे. त्यासाठी आधी नगररचना योजना राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शेतकºयांकडून जमिनी घेऊन त्या एकत्रित करून एकच सर्व्हे नंबरप्रमाणे गृहीत धरून लॅण्ड पुलिंग करण्यात येईल आणि त्यानंतर पन्नास टक्के जागा शेतकºयांना परत देण्यात येतील. यात भूसंपादनाचा प्रकार नसून बाधित शेतकरीच भागीदार असणार आहेत. त्यामुळे शेतकºयांना लाभ मिळेल अशी माहिती यावेळी देण्यात आली तसेच कांचन बोधले यांनी महापालिकेने एकदा इरादा जाहीर केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्याला राजपत्रात प्रसिद्धी मिळेल आणि त्यानंतर हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही होऊन अंतिमत: नऊ महिन्यांत योजना अंतिम होईल तसेच तीन वर्षांत योजना पूर्ण होईल असे सांगितले.मग, प्रस्तावाची घाई कशासाठी ?महापालिकेच्या वतीने शेतकºयांना नगररचना योजना प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच तत्पूर्वी शेतकºयांना अहमदाबाद दौरा घडविण्यात आला. त्याआधी महासभेवरच मखमलाबाद येथे नगररचना परियोजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; मात्र हा सर्व उलटा क्रम ही योजना राबविण्याचा प्रस्ताव महासभेत कसा काय पाठविला गेला, असा प्रश्न शरद कोशिरे यांच्यासह अन्य शेतकºयांनी केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी