शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निकालापूर्वीच राज ठाकरेंकडून ऑडिट विधानसभेची तयारी: पालिकेच्या कामगिरीचा पंचनामा

By admin | Updated: May 10, 2014 23:52 IST

नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही नागरिकांना अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. नाशिक येथे आज प्रत्येक नगरसेवकांशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. इतकेच नव्हेतर महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.

नाशिक : महापालिकेत सत्ता मिळूनही नागरिकांना अपेक्षित कामे होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत टीकेला सामोरे गेलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालापूर्वीच निर्णयाचा अंदाज बांधून कारणमीमांसा सुरू केली आहे. नाशिक येथे आज प्रत्येक नगरसेवकांशी इन कॅमेरा चर्चा करतानाच त्यांनी लोकसभेतील परिस्थितीबरोबरच पालिकेत सत्ता असताना कोठे कमी पडतोय याविषयी नगरसेवकांच्या भावना जाणून घेतल्या. इतकेच नव्हेतर महापौर आणि आमदारांच्या कामगिरीविषयीदेखील प्रश्न उपस्थित केल्याने नजीकच्या काळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर नाशिककरांनी त्यांना भरभरून साथ दिली आणि महापालिकेची सत्ताही दिली. तथापि, गेल्या दोन ते अडीच वर्षांच्या कालावधीत नागरिकांचे समाधान होऊ शकेल अशा पद्धतीने काम होऊ न शकल्याने लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. लोकसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरल्याने आणि राज्यात अन्य ठिकाणी या मुद्याची चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत मनसेच्या कामगिरीवरच अनुकूल किंवा प्रतिकूल कौल मिळण्याची शक्यता असल्याने राज ठाकरे यांनी पुन्हा नाशिकमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी अचानक नाशिक दौरा आखला आणि शनिवारी राजगड येथे लोकसभा निवडणुकीतील आढाव्याबरोबरच पालिकेतील कामगिरीची माहिती घेऊन एकप्रकारे पंचनामाच केला. लोकसभा निवडणुकीतील टीका विधानसभेच्या निवडणुकीतदेखील होऊ नये यासाठीच दक्षता घेतल्याचे स्पष्ट होत आहे.पालिकेतील ३९ पैकी ३७ नगरसेवकांशी एकावेळी एकच अशी चर्चा राज ठाकरे यांनी केली. पालिकेत कामे होतात काय, तुमच्य प्रभागात किती कामे झाली? किती कामे मंजूर आहेत, कामे झाली असतील तर त्याबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचली काय, असे प्रश्न करताना दहा कोटी, वीस कोटी रुपयांची कामे झाली असे सांगणार्‍या नगरसेवकांकडून सायंकाळपर्यंत कामांच्या याद्याही मागविल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काय झाले हे माहीत आहे, परंतु तरीही तुम्ही सांगा प्रचारात काय अडचणी आल्या असा प्रश्नही त्यांनी केला. उमेदवार योग्य होता काय, समन्वय कसा होता, असे अनेक प्रश्न राज ठाकरे यांनी गोपनीय भेटींमध्ये केल्याने अनेकांनी उघडपणे महापौर आणि अन्य पदाधिकार्‍यांच्या कामगिरीवर टीका केली. या सर्व मुद्यांची नोंद राज ठाकरे यांनी स्वत: लेखी करून घेतली.