मालेगाव : शहरातील कुसुंबा रोड लगतच्या जीवन रुग्णालयाच्या खालच्या दोन बंदिस्त गाळ्यांमध्ये अवैधरीत्या विनापरवाना आॅनलाइन लॉटरीचा जुगार खेळणाऱ्या १२ जणांविरुद्ध द्याने-रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकून सदर कारवाई केली आहे. पथकाने त्यांच्याकडून रोख रक्कम १८ हजार ५९०, जुगाराचे साहित्य असा एकूण ३६ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना आॅनलाइन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, हवालदार देवीदास निकम, दिनेश शेरावते, अभिजीत साबळे, मिलींद पवार आदींच्या पथकाने छापा टाकून आॅनलाइन जुगार खेळणाºया रवींद्र विकास यशोद, नितीन जवाहरलाल पवार, दिनेश संजय पाटील, अहमद रजा मुर्तुजा हसन, राजरतन राहुल पवार, अब्दुल साजीद अ. जाफर, मुश्ताक सय्यद शेख, संतोष हरिभाऊ जमदाडे, शेख अनिस शेख नदीम, शेख अजीज शेख अब्दूल, शेख मोमीन शेख शकील, बापू लोहारकर अशा १२ जणांना अटक केली आहे.
मालेगावी आॅनलाइन जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:35 IST