शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

देवळ्याच्या चिमुरडीचे पंतप्रधानांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 14:04 IST

लोहोणेर : विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘डिझाईन फॉर चेंज’ या उपक्र मांतर्गत ‘नदी-नाल्यांचे प्रदूषण’ या विषयावर देवळा तालुक्यातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी डिंपल केदा शेवाळे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राची दखल घेत तिचे अभिनंदन केले आहे.

लोहोणेर : विद्यार्थ्यांना शाळा स्तरावर सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘डिझाईन फॉर चेंज’ या उपक्र मांतर्गत ‘नदी-नाल्यांचे प्रदूषण’ या विषयावर देवळा तालुक्यातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी डिंपल केदा शेवाळे हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राची दखल घेत तिचे अभिनंदन केले आहे.लोहोणेर येथील खालपफाटा जिल्हा परिषद शाळेने नद्यांच्या स्वच्छतेचा प्रकल्प हाती घेतला आहे . त्या उपक्र माचा एक भाग म्हणून संपूर्ण देशातील नद्या कशा स्वच्छ करता येतील यासाठी विद्यार्थिनी डिंपल केदा शेवाळे हिने या संदर्भात पंतप्रधान कार्यालय व भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाला पत्र लिहुन कार्यवाहीसाठी विनंती केली होती. डिंपल शेवाळे या विद्यार्थिनीच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून डिंपल व शाळेच्या मुखाध्यापिका पुष्पा गुंजाळ व डिझाईन फॉर चेंजच्या प्रकल्प समन्वयक उपशिक्षिका वैशाली सुर्यवंशी यांचे या अभिनव उपक्र माबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून नदी स्वच्छता या विषयावर सविस्तरपणे कार्य करण्याच्या सुचना केल्या आहेत.‘डिझाईन फॉर चेंज’ या शिक्षण विभागाने राबविलेल्या अभिनवउपक्रमाला गेल्या वर्षापासून जिल्ह्यात सर्वत्र सुरूवात झाली आहे. त्यात व्यक्तिगत, सार्वजनिक, शैक्षणिक, सामाजिक वा कोणत्याही प्रश्नावर जी समस्या असेल त्यावर शिक्षक विद्यार्थी एकत्र बसून चर्चा करतात, त्याचे समाधान कारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाने या समस्यांचा आपआपल्या परीने अभ्यास करून त्याचे उत्तर शोधावे व सर्वांनी एकत्र बसून त्याची सविस्तर चर्चा करून अनुभव कथन करावे व त्याचे एकत्रित सादरीकरण करून समस्या सोडवावी असा या उपक्र मामागचा हेतू आहे.

टॅग्स :Nashikनाशिक