शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात साहित्याचा वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 17:46 IST

येवला तालूक्यातील राजापूर येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते होऊन दोन महिने उलटूनही प्राथमिक आरोग्य केंद्राला अद्याप डॉक्टर व दवाखान्यासाठी लागणारे साहीत्य उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

राजापूर येथे आरोग्य केंद्राची इमारत लाखो रूपये खर्च करून उभारली, मात्र याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. पिण्यासाठी पाणी नाही व रूग्णांना सुविधा मिळत नाही. आरोग्य केंद्राच्या या इमारतीची असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा राजापूर, सोमठाणजोश पन्हाळसाठे, ममदापूर , खरवंडी, देवदरी व परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे . सध्या हिवाळा असल्याने थंडी जास्त प्रमाणात असल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात दिवसा खासगी डॉक्टर असतात परंतू रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. परिणामी रूग्णांना रात्रीच्या वेळी थेट येवला येथे जावे लागते. सध्या राजापूर व परिसरात दूष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी व मजूरांना कामे नाहीत, त्यात घरातील व्यक्ती आजारी पडल्यावर दवाखान्याला पैसे नसल्यामुळे अनेक गरिब रूग्ण दवाखान्यात न जाता घरीच अंगावर दूखणे काढण्याची वेळ गरिब शेतकरी व मंजूराची आली आहे .त्यामुळे राजापूर येथील आरोग्य केंद्राला कर्मचारी व सोयी सूविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी मागणी शंकरराव अलगट, समाधान चव्हाण, अशोक आव्हाड,बबन अलगट, भारत वाघ, लक्ष्मण घुगे, शंकर मगर, भाऊसाहेब बैरागी, राजेन्द्र वाघ ,गोकूळ वाघ, सागर अलगट, संजय कासार व ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्य