शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकºयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:36 IST

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.

ठळक मुद्देयोजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी,

नाशिक : सामूहिक शेती प्रयोगामुळे शेतीव्यवसाय सकारात्मक बदल झाला आहे. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग करणाºया शेतकºयांमुळे उत्पादनात वाढ होत आहे. शासनाकडून शेतकºयांसाठी अनेक योजना राबविल्या जातात या योजना शेतकºयांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आदर्श शेतकºयांनी पार पाडावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी केले.माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा परिषदेत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगळे बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य महेंद्रसिंग काले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ, जिल्हा वनअधिकारीरणावत, माजी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, निवृत्त पोलीस कॉन्सटेबल काका चव्हाण, कृषी प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सुनील वानखेडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सांगळे म्हणाल्या की, जिल्'ातील शेतकºयांनी चांगले काम केलेले आहे. या शेतकºयांनी इतर शेतकºयांना प्रगतशेतीकडे वळविले पाहिजे. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतीविकासाची पायाभरणी केली आहे याचा अभिमान असल्याचे सांगळे यांनी यावेळी सांगितले. कृषी समिती सदस्य महेंद्रसिंग काले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी सांगितले, वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना, जलसंधारण, संकरित बियाणे मोहीम राबवून हरित शेतीसमृद्ध केली.याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी, संस्था आणि बचतगटांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि शेवग्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षक संजीव पडवळ म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेमुळे एक लाख २५ हजार क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार ही योजना आता लोकचळवळ झाली आहे. विशेष म्हणजे अनेक खासगी कंपन्या आपल्या सीएसआर फंडाद्वारे या चळवळीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे हजारोंच्यावर गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा पडवळ यांनी केला. यावेळी त्यांनी उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाचीही माहिती दिली. कृषी विकास अधिकारी हेमंत काळे यांनी आभार मानले.

बचतगटदारणामाई स्वयंसहा, बचत गट, पळसे, नाशिक, कश्यपी सेंद्रिय शेतमाल बचत गट, वाघेरा, त्र्यंबकेश्वर, शाश्वत शेतकरी बचत गट, दोडी बु., सिन्नर, कश्यप कृषी विकास गट, जोपूळ, चांदवड, श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव, येवला, माती फाउण्डेशन सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, रावळगाव, मालेगाव, श्रीशंकर महाराज सेंद्रिय शेतमाल उत्पादक गट, अंतापूर, सटाणासंस्था रोकडेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., निमगाव, सिन्नर, ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., उगाव, निफाड, ३) फायुस्टार ग्रीन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., सावकी, देवळा, शिवराणा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., नारूळ, कळवण, पंचरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., पानेवाडी, नांदगाव, दारणामाई फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., मुकणे, इगतपुरी, मल्हार अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि., बोपेगाव, दिंडोरी.पीक स्पर्धा विजेतेगोरख हिरामण केकाणे, सायगाव, येवला (प्रथम खरीप), शिवाजी रामा सोनवणे, साताळी, येवला ( द्वितीय खरीप)े, मच्छिंद्र चंद्रभान उशीर, सायगाव, येवला (तृतीय खरीप), रतन नामदेव पैठणकर, नगरसूल, येवला (प्रथम रब्बी), श्रीमती कमला रतन पैठणकर, धूळगाव, येवला (द्वितीय रब्बी), श्रीमती मीनाबाई गणपत अनथ, नगरसूल, येवला (तृतीय रब्बी).वैयक्तिक शेतकरीबबनराव धोंडीराम कांगणे, दोणवाडे, ता. नाशिक, जयराम होनाजी गायकवाड, उंबरपाडा दि., ता. सुरगाणा, अविनाश मनोहर पाटोळे, वडनेर भैरव., ता. चांदवड बद्रीनाथ रामभाऊ जाधव, वडगाव, बल्हे, ता. येवला, समाधान काशीनाथ वाघारे, कोणे, ता. त्र्यंबकेश्वर, महेश जिभाऊ पाटील, मुळाणे, ता. सटाणा,भागवत विठोबा बलक, वडगाव, ता. सिन्नर, शिवाजी कोंडाजी मोंढे, अडसरे, ता. इगतपुरी, धनंजय विश्वासराव देशमुख, तळवाडे, ता. मालेगाव, श्रावण पावजी गायकवाड, पाठरूण, ता. कळवण, प्रकाश बापूराव पाटील, सावकी (लो.), ता. देवळा,सुधाकर दगू पवार, नागापूर, ता. नांदगाव, यशवंत महादू गावंडे, गावंधपाडा, ता. पेठ.