द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:22 AM2018-10-07T00:22:06+5:302018-10-07T00:25:10+5:30
सायखेडा : गोदाकाठ भागातील द्राक्षबागांच्या आॅक्टोबर महिन्यातील गोडबार छाटणीला वेग आला असून, बागांच्या कामासाठी पेठ, सुरगाणा तसेच गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवरील बलसाड जिल्ह्यातील अनेक शेतमजूर परिसरात दाखल झाल्याने जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शेतात सगळीकडे द्राक्षबागांतील फळधारणेची काडी पेस्टमुळे लाल रंगाची करावी लागत असल्याने सगळा शिवार लालेलाल झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष देशात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत म्हणून युरोपीय आणि आखाती देशात नाशिकची द्राक्ष निर्यात होतात. द्राक्ष बागाईतदारांसाठी आॅक्टोबर छाटणी अतिशय महत्त्वाची असते. या महिन्यात छाटणी करून झाडाला प्रत्यक्ष फळ येते, त्यामुळे झाडाने सक्षम आणि निरोगी फळ द्यावे, त्याची योग्यप्रकारे वाढ व्हावी, उत्तम आकाराची आणि गोडी असलेली द्राक्ष आपल्या बागेला यावीत यासाठी बागायतदार शेतकरी अहोरात्र मेहनत घेतो. सुरगाणा आणि पेठ या आदिवासी तालुक्यात डोंगराळ भाग जास्त प्रमाणात असल्याने शेती आणि उद्योग फारसे नसल्याने हाताला काम मिळत नाही, त्यामुळे निफाड तालुक्यात द्राक्षबागांतील कामे करण्यासाठी जवळपास २५ वर्षांपासून खोकडविहीर येथून ५० माणसांची टोळी दरवर्षी घेऊन येतो, चार पैसे चांगले मिळतात.
- एकनाथ म्हसे, टोळी मुकादम