शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
3
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
4
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
5
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
6
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
7
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
8
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
9
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
10
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
11
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
12
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
13
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
14
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
15
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
16
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
17
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
18
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
19
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
20
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?

प्रेमाच्या सप्ताहात गुलाबाने घेतला भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:36 IST

देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ह्यव्हॅलेंटाइन डेह्ण. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ह्यव्हॅलेंटाइन डेह्णसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णच्या पार्श्वभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने तरुणाईच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.

ठळक मुद्देदरात दुपटीने वाढ : तरुणाईत उत्साह, बाजारपेठा सजल्या

देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ह्यव्हॅलेंटाइन डेह्ण. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या ह्यव्हॅलेंटाइन डेह्णसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगांचे गुलाब दाखल झाले आहेत. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णच्या पार्श्वभूमीवर गुलाबाचे दर दुपटीने वाढल्याने तरुणाईच्या खिशाला झळ पोहोचणार आहे.ह्यव्हॅलेंटाइन वीकह्ण साजरा करण्याचा प्लॅन केलेल्या प्रेमवीरांच्या खिशाला यंदा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ह्यरोझ डेह्णलाच झळ बसली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाल्यामुळे, गुलाबाच्या एका फुलासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस रुपये मोजावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली की, तरुणांमध्ये उत्सुकता असते, ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच ह्यव्हॅलेंटाइन डेह्णची. काही लोक आपल्या पार्टनरला फूल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात, तर कुणी पार्टनरला रोमँटिक डेटला घेऊन जाते. ह्यरोझ डेह्णपासून ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णची सुरुवात होते.

या दिवशी प्रेमाचे प्रतीक म्हणून समजले जाणारे गुलाबाचे फूल आपल्या आवडत्या व्यक्तीला दिले जाते. बाजारात आलेल्या गुलाबाच्या फुलांमधील मोहक आणि ताजे असे गुलाब निवडून आपल्या मनातील प्रेमाची ह्यनाजूकह्ण भावना व्यक्त करण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. यंदा मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फुलांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांचे उत्पादन २० ते ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत १५ ते २० रुपये एका गुलाबाच्या फुलासाठी मोजावे लागत आहेत. त्यातच आता ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णमध्ये गुलाबाच्या फुलांची मागणी लक्षात घेता, हे भाव २० ते २५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.                    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फूल उत्पादक शेतकऱ्यांसह फूल विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रेमाच्या या उत्सवात फूल व्यवसायाला उभारी मिळण्याचे चित्र दिसून येत आहे. ह्यव्हॅलेंटाइन वीकह्णचा पहिला मान प्रेमाचा सुंगध परविणाऱ्या गुलाबाला आहे. यासाठी फुलांची बाजारपेठ सजली आहे. मात्र, गुलाब खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. गत आठवड्यात १० प्रति नगाने विक्री होत असलेल्या गुलाबाचे दर दुपटीने वाढून २० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. वाढलेले दर हे २० फेब्रुवारीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे एका फूल विक्रेत्याने सांगितले.अतिवृष्टीचा फुलशेतीला फटकावातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांचा परिणाम यंदा फुलांच्या उत्पादनावर झाला आहे, तसेच जानेवारीमध्ये झालेल्या अतिवृष्टीचाही फुलशेतीला फटका बसला आहे. गुलाबाच्या फुलांच्या उत्पादनाचा विचार केल्यास यंदा त्यामध्ये जवळपास ३० टक्के घट झाली आहे.फोटो- गुलाबाच्या फुलांचे फोटो वापरावेत.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे