शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राष्टयीकृत बॅँकांकडून नवीन खातेदारांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 18:40 IST

महिला कर्मचा-याने आजीलाच उलट प्रश्न करत आमच्या बँकेतच खाते कशाला उघडता, असा प्रश्न खडसावत बँकेतून आजीला निघून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित एका लष्करी जवानाने त्या महिला कर्मचा-याला ग्राहकांनी खाते उघडले नाही,

ठळक मुद्देखाते उघडण्यास नकार : तक्रार केल्यास ‘बाहुबली’चा धाकनानेगाव बँकेच्या शाखेत अर्जाकरिता सत्तर रुपये लागतात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आमच्या बँकेतच खाते का उघडता, असा प्रश्न देवळालीच्या राष्ट्रीय बँकेत बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांना विचारला जातो, तर नानेगाव येथे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना लागणा-या अर्जासाठी चक्क सत्तर रुपये आकारण्याचा प्रकार घडत आहे. याबाबत तक्रार करून काहीच कारवाई होत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

शुक्रवारी देवळाली कॅम्पमध्ये एक वयोवृद्ध आजी बचत खाते उघडण्यासाठी आल्या असता तेथील महिला कर्मचा-याने आजीलाच उलट प्रश्न करत आमच्या बँकेतच खाते कशाला उघडता, असा प्रश्न खडसावत बँकेतून आजीला निघून जाण्यास सांगितले. यावेळी उपस्थित एका लष्करी जवानाने त्या महिला कर्मचा-याला ग्राहकांनी खाते उघडले नाही, तर कर्मचाऱ्यांना कामच राहणार नाही अशी जाणीव करून दिली. त्यावर कागदपत्रे अपूर्ण असल्याची सारवासारव त्या महिला कर्मचा-याने केली.नानेगाव येथील राष्ट्रीयीकृत बँकेत लष्करी जवान आपल्या पत्नीसह बचत खाते उघडण्यास गेला असता संयुक्त खात्यासाठी आवश्यक असलेला अर्ज बाजूला मिळतो, असे सांगितले व जवानाकडून अर्जाची किंमत म्हणून सत्तर रुपयाची मागणी केली. सदर जवानाने याबाबत अर्ज बँकेत का मिळत नाही अशी विचारणा केली तर तेथेही आमच्या बँकेत का येतात? अशी विचारणा केली गेली. त्यावेळी जवानाने सदर बँक घराजवळ असल्याने आलो, तुम्ही शाखा बंद करा म्हणजे आम्ही बँकेत येणार नाही, असे उत्तर दिले. सदर जवानाने बँकेतून घरी गेल्यानंतर नानेगाव बँकेच्या शाखेत अर्जाकरिता सत्तर रुपये का लागतात याची तक्रार बँकेच्या टोल फ्री नंबरवर केली. या तक्रारीनंतर दुसºया दिवशी त्याच शाखेतून जवानाशी भ्रमणध्वनीने संपर्क साधून तक्रार मागे घेण्यासाठी बँकेत येण्याची सूचना करण्यात आली. मात्र जवान न गेल्याने त्याने तक्रार मागे घेण्यासाठी बँकेतून थेट त्या गावातील ‘बाहुबली’ नेत्यास साकडे घालण्यात आले. रात्री ८ वाजता जवान बँकेत गेला असता, ‘तुमच्यामुळे आम्हाला बँक सुरू ठेवावी लागली, तुम्ही तक्रार केलीच कशाला’ अशा शब्दात कर्मचा-यांनी जवानाला सुनावले. राष्टÑीयीकृत बॅँकांच्या या मुजोरीचा सर्वसामान्य खातेदाराला त्रास सहन करावा लागत असून, एकीकडे बॅँकांचा खातेदार वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र ग्राहक नको अशी भूमिका घेतली जात आहे.

 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक