शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात घुसखोरी करणारे लोंढे रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 23:06 IST

मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची सतर्कता : वैद्यकीय तपासणीनंतर मालेगावी पुन्हा रवानगी

सटाणा : मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर त्याचा शिरकाव अन्य भागात होऊ नये म्हणून सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असलातरी रात्री-पहाटेची वेळ साधून माणसांचे लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येत असल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी शहरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोन महिलांसह दहा जणांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला. नागरिकांना या लोकांना अडवून पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, पोलिसांनी मालेगावच्या या दहा जणांची सटाणा ग्रामीण रु ग्णालयात वैद्यकीय तपासणी करून मालेगावला रवानगी करण्यात आली.कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मालेगावला लागून असलेल्या सर्वच सीमा बंद करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले होते. सीमाबंदीचे आदेश देऊनही बागलाणच्या लखमापूर, वायगाव, अंबासन, ठेंगोडा येथून रात्री-पहाटेच्या सुमारास लोंढेच्या लोंढे बागलाणमध्ये राजरोस घुसत असल्याचे वेळोवेळी नागरिकांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मालेगावात कोरोनाने थैमान घातल्यानंतर प्रशासनाने मालेगाव शहर पूर्णपणे चारही बाजूने सील करण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले, असे असताना बागलाणमध्ये आजही ग्रामीण भागातील आडमार्गाने मालेगावातील लोंढे पायी मार्गक्र मण करताना दिसून येत आहेत. सोमवारी (दि. १३) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान शहरातील आराई फाट्यावरील नागरिकांना काही लोंढे मालेगावकडून सटाण्याकडे येताना दिसले. काही लोंढे शहरात पसार होण्यास यशस्वी झाले तर दोन महिलांसह दहा जणांना अडविण्यात नागरिक यशस्वी झाले. नगरसेवक आबा सोनवणे, नितीन सोनवणे, दगा बापू सोनवणे यांनी तत्काळ सटाणा पोलिसांशी संपर्क साधून घुसखोरी बद्दल माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी सर्वांची विचारपूस करून त्यांना रुग्णवाहिकेतून सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांची रवानगी मालेगावला करण्यात आली. कोरोनामुळे भेदरलेल्या मालेगावचे लोंढे बागलाणमध्ये घुसखोरी करत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.जिल्हा प्रशासनाने सीमाबंदीचे निर्देश दिले असतानाही बागलाणमध्ये खुलेआम घुसखोरी सुरू असल्याचे दिसून येते. तालुक्यात बाभूळणे, मानूर, चिराई घाट, अंबासन, वायगाव, लखमापूर, ठेंगोडा, डांगसौंदाणे येथे सीमाबंद करण्यात आल्या आहेत, असे असताना मालेगाव तसेच बाहेर गावच्या शेकडो लोकांची घुसखोरी आजही सुरू आहे. मालेगावातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी याबाबत अधिक दक्ष राहण्याची अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस