शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

प्रेस अधिकारी, कामगार देणार केरळला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:18 IST

केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकरोड : केरळ राज्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून भारत प्रतिभूती, चलार्थपत्र मुद्रणालय व महामंडळाच्या एकूण ९ युनिटमधील अधिकारी व कामगारांचे एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  केरळ राज्यात गेल्या पंधरवड्यात अतिवृष्टी व पुराने थैमान घातले असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पुरामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टी व पुरामुळे विविध समस्या निर्माण झाल्या असून अजूनही काही भागातील पाणी हळूहळू ओसरत आहे. पाऊस व पुरामुळे सर्वस्व वाहून गेल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  केरळच्या पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या नऊ युनिटमधील अधिकारी, कामगारांच्या एक दिवसाचे वेतन केरळ मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुद्रणालय महामंडळाचे अपर महाप्रबंधक बी. जे. गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वीच नऊ युनिट प्रबंधकांना याबाबत पत्र पाठविले आहे. भारत प्रतिभूती मुद्रणालयात २१२६, चलार्थपत्र मुद्रणालयात १९४५ व नऊ युनिट मिळून एकूण ६ हजार ५०० अधिकारी, कामगार आहेत.  देशामध्ये नैसर्गिक आपत्ती, संकट आल्यावर मुद्रणालयातील कामगार नेहमी सर्व प्रकारच्या मदतीसाठी एकजुटीने आघाडीवर राहिले आहेत. प्रत्येकवेळी प्रेस कामगारांकडून मोठी मदत दिली जाते.

टॅग्स :floodपूरKerala Floodsकेरळ पूर