नाशिक : तळेगाव येथील अल्पवयीन पीडित मुलीची बुधवारी (दि़ १२) खासदार संभाजीराजे भोसले, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाई जगताप व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी केली़ तसेच या मुलीच्या पालकांसमवेत चर्चा करून त्यांच्या अडचणी वा सुविधांची माहिती घेतली़ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथील पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि़ ८) सायंकाळच्या सुमारास घडली होती़ या घटनेचे तीव्र पडसाद दुसºया दिवशी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घडले होते़ तर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये गत तीन दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे़ या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, भाई जगताप व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित मुलीच्या प्रकृतीची चौकशी करून पालकांशी चर्चा केली. खासदार संभाजीराजे भोसले यांनी या पीडित मुलीवर उपचार करणाºया डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. जी. एम. होले यांच्याशी चर्चा केली़ (प्रतिनिधी)
महिला आयोगाच्या अध्यक्ष नाशिकमध्ये
By admin | Updated: October 13, 2016 00:17 IST