नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तर सेवा पदक श्रेणीत नाशिक शहर गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक अनंत साहेबराव पाटील, नाशिक ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाचे हेड कॉन्स्टेबल संतू शिवनाथ खिंडे व नाशिक ग्रामीण दलातील राज्य गुप्तवार्ता विभातील हेड कॉन्स्टेबल विष्णू बहिरू पाटील यांची निवड झाली आहे.
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी पोलीस दलाच्या सेवेतील शौर्यासाठी आणि उल्लेखनीय कार्यासाठी निवडक अधिकारी, कर्मचारी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरव केला जातो. या अधिकारी व कर्मचारी यांच्या नावाची स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील एकूण ७४ पोलिसांना पोलीस पदक जाहीर झाले. यातील ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तसेच प्रशंसनीय सेवेकरिता ४५ पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले. यात नाशिक जिल्ह्यातील चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाचा समावेश असल्याने नाशिक पोलीस दलातून आनंद व्यक्त होत आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये ६३० व सेवा पदक श्रेणींमध्ये ७५० असे एकूण १ हजार ३८० पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
शौर्य पदक श्रेणीत २ राष्ट्रपती पोलीस पदक’, तर ६२८ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ व ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ७४ पदक मिळाली असून त्यात नाशिकच्या चार पदकांचा समावेश आहे.
उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते
अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’
अनंत साहेबराव पाटील, सहायक उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर.
संतू शिवनाथ खिंडे, हेड कॉन्स्टेबल, पोलीस नियंत्रण कक्ष, नाशिक शहर
विष्णू बहिरू पाटील, हेड कॉन्स्टेबल (इंटेलिजन्स ऑफिसर), राज्य इंटेलिजन्स विभाग, नाशिक ग्रामीण.
140821\14nsk_46_14082021_13.jpg
१)अशोक उत्तम अहिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओझर एअरपोर्ट सुरक्षा.२)अनंत साहेबराव पाटील, सहाय्यक उप निरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक शहर.