शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेत सहाव्यांदा बससेवेचा प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:35 IST

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.

ठळक मुद्देबुधवारी फैसला : मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे शहर वाहतूक

नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे.महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्यास देण्याचे प्रस्ताव पाचवेळा मांडण्यात आले होते; मात्र ते फेटाळण्यात आले. आजवरचे प्रस्ताव हे राजकीय पक्षांच्या पुढाकाराने येत होते. मात्र यंदा प्रथमच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव मांडला आहे. त्यामागेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असून, गेल्या वर्षी नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शहर बस वाहतूक ही महापालिकेने चालवण्यासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका अधिनियमात बंधनात्मक नसलेली म्हणजे ऐच्छिक कर्तव्यात दिलेली ही सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येत्या महासभेवर प्रस्ताव सादर केला असून, चारशे बस खासगीकरणातून चालविण्यात येणार आहेत. नवी मुंबईच्या धर्तीवर ठेकेदाराला प्रति किलोमीटर खर्च देऊन ही सेवा चालू करण्याचा प्रस्ताव असून, त्यात परिवहन समितीची कोणीतीही तरतूद नाही. विशेष म्हणजे बहुतांशी राजकीय पक्षांचा या सेवेला विरोध आहे. असे असतानाही सेवा महापालिकेनेच सुरू करावी असा सरकारचा अट्टाहास आहे.१९९५ मध्ये महापौर प्रकाश मते यांच्या कारकिर्दीत ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला होता. परंतु विषय फेटाळला गेला. त्यानंतर डॉ. शोभा बच्छाव महापौर असताना महामंडळाने प्रस्ताव दिला तेव्हा ही सेवा नाकारण्यात आली. परंतु त्याचबरोबर विनायक पांडे, बाळासाहेब सानप आणि अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या महापौरपदाच्या कालावधीतही प्रस्ताव होते. परंतु ही तोट्यातील सेवा असल्याने नकार देण्यात आला होता. बाळासाहेब सानप महापौर असताना तर शंभर बस खरेदी करण्यासाठी केंद्र शासनदेखील तयार होते. परंतु परिवहन महामंडळाने या बस स्वत:च्या ताब्यात घेतल्या आणि महापालिकेने त्यांना ही सेवा चालविण्याचे स्वारस्य नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आत्तापर्यंतच्या फेटाळलेल्या बससेवाच्महापालिकेने स्वत: बस खरेदी करून सेवा चालविण्याचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी याच क्रिसील कंपनीने अहवाल देताना ही सेवा तोट्यात जाईल असे स्पष्ट केले होते.च्महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी स्वारस्य घेतलेल्या बीआरटीएस सेवेचा, अहमदाबाद येथील सेवेचा अभ्यास करण्यात आला. मात्र, त्यावेळीदेखील ही सेवा पूर्णत: तोट्यात आढळली होती. शिवाय मोठ्या रस्त्यांवरच बीआरटीएस अन्य रस्त्यावर पूरक साध्या बस किंवा रिक्षांचा वापर होणार होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच हा एक हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव फेटाळला होता.च्आता पुन्हा हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यात ठेकेदारीचा समावेश करण्यात आला आहे; परंतु महापालिकेचा ठेकेदारीविषयी अनुभवदेखील कटू असून, अनेक ठेकेदारांनी खासगीकरणाच्या तरतुदीचा आधार घेऊन लवाद नेमून स्वत:च्या सोयीचे निकाल लावले तसेच महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा घाटादेखील झाला आहे.