शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:28 IST

नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देमध्यम सरींचा वर्षाव : चाकरमान्यांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला.पावसाने यंदा दडी मारली असून, शहरात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. आगॅस्ट महिन्याचे दहा दिवस उलटले असले तरी अद्याप गोदावरी या हंगामात दुथडी भरून वाहताना नजरेस पडलेली नाही. गेल्या वर्षी गोदावरीला महापूर याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला होता. यावर्षी पावसाने निराशा केली आहे. सोमवारी संध्याकाळी मध्यम सरींनी नाशिककरांना ओलेचिंब भिजविले. संध्याकाळी अचानकपणे आलेल्या सरींमुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकस्तंभ, रविवारकारंजा, पंचवटी, मुंबईनाका, शरणपूररोड, अशोकामार्ग, डीजीपीनगर, वडाळागाव, इंदिरानगर, सिडको या भांगात सुद्धा पावसाने हजेरी लावली. उपनगरांमध्ये रात्री ८ वाजता पावसाला दमदार सुरुवात झाली. तोपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातसुद्धा सरींचा जोर टिकून होता. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात सरींचा शिडकावा झालेला नव्हता; मात्र ६ वाजेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरीय भागांतसुद्धा पावसाने सलामी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसाच्या मध्यम सरींचा वर्षांव झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

टॅग्स :city chowkसिटी चौकRainपाऊस