शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

ओझर यात्रोत्सवासाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 23:33 IST

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास सोमवारी चंपाषष्ठीपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य रूप धारण करत चार ते पाच दिवस भरते. ७ डिसेंबरपर्यंत यात्रा भरणार आहे.

ठळक मुद्दे विलोभनीय सोहळा : ग्रामपालिकेकडून तयारी पूर्ण, मंदिराला आकर्षक रोषणाई

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास सोमवारी चंपाषष्ठीपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य रूप धारण करत चार ते पाच दिवस भरते. ७ डिसेंबरपर्यंत यात्रा भरणार आहे.त्यानिमित्ताने ओझर ग्रामपालिकेकडून संपूर्ण दुकानांचे जागावाटप जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करून देण्यात येणार असल्याचे ग्रामपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. ओझरचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस ठाण्याकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.यात्रोत्सवात पहिल्या दिवशी विश्वस्तांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतात. त्यानंतर षष्ठीपर्यंत श्री मल्हार माहात्म्य या ग्रंथाचे पारायण होते. प्रत्येक दिवशी चढत्या क्रमाने मूर्तीवर पुष्पमाला चढविण्यात येणार आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी पारायणाच्या व्रताची सांगता होऊन पहाटे पुजारी व मान्यवरांकडून महापूजा करण्यात येणार आहे.महापूजेनंतर श्री खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लावण्यात येणार आहे, तर पहिल्या दिवशी भंडारा उधळण्यात येतो. संपूर्ण गाव जणू सोन्याचं होतं. बाणगंगा नदीचे दर्शन करून अश्व पुढे मंदिराकडे नेला जातो.खंडेराव महाराजांचा जयघोष करत कै. विष्णुपंत पगार यांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार-गवळी, रास्कर, भडके, कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांची गाडी असा मल्हाररथ अश्वाच्या मदतीने गोरजमुहूर्तावर ओढून यात्रेला सुरुवात होणार आहे.ही ईश्वरी अनुभूती व हा थरार अनुभवण्यासाठी लाखों आबालवृद्ध भाविक गर्दी करतात. भंडाऱ्याची उधळण व सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून जातो. यात्रेच्या दुसºया दिवशी भाविक खंडेरायाच्या दर्शनाला गर्दी करतात. कलात्मक रथाचे आकर्षणओझरच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. सुबक कलाकृती, जुन्या पिढीतील सुतारकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे ओढला जाणारा रथ. या रथाची रचना बैलगाडीप्रमाणे असते. चाके, धुºया, साटा, जू ही मूळ बनावट गृहीत धरतच त्याची घडण म्हणजे हा रथ असतो. चाकावर चार चोपा काटकोनात लावतात व या चोपांना आठ सोटगे खालून जोडतात. तिच्या दोन बाजूंना वांगे व पपईत गज कलात्मकरीतीने टोचतात. हा रथ जाताना प्रौढांकडे नियोजनाचे तर वयोवृद्धांकडे मार्गदर्शनाचे काम असते. सजवलेली बैलजोडी रथाला जोडण्यात येते. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो.व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो.मंगळवारचा आठवडे बाजार राहणार बंदओझर येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार यात्रेमुळे बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने सर्वच गावातून नागरिक येथे येत असतात. त्यामुळे येत्या मंगळवारी आठवडे बाजार भरणार नसल्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

टॅग्स :TempleमंदिरOzarओझर