शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

३००च्या पाणीमीटरसाठी पोलिसांची अशीही तत्परता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:11 IST

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांची घरफोडी, चोऱ्यांचे प्रकार घडत असताना यातील संशयितांना पकडण्यासाठी व तपासासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही.

सिडको : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपयांची घरफोडी, चोऱ्यांचे प्रकार घडत असताना यातील संशयितांना पकडण्यासाठी व तपासासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही. दुसरीकडे अवघ्या तीनशे रुपये किमतीच्या पाणीमीटर चोरीच्या तपासासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी मालकाच्या घरी हजेरी लावत पंचनामा केला.पाथर्डीफाटा येथील रहिवासी सोपान दगडू नायकवाडी यांचे अंबड येथील शांतीनगर वसाहतीत एका शॉपमध्ये कंपनीचे कामकाज चालते. नायकवाडी यांनी त्यांच्या शॉपच्या बाहेरच्या जागेत पाणीमीटर बसविले असून, या पाणीमीटरची चोरी झाल्याने त्यांनी थेट आॅनलाइन तक्रार केली. या तक्रारीची माहिती अंबड पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने नायकवाडी यांना पोलीस ठाण्यात बोलविले.याप्रकरणी अंबड पोलिसांनी गेल्या १६ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाणीमीटर चोरीचा गुन्हादेखील दाखल करीत पंचनामाही केला.दुसरीकडे मार्च महिन्याच्या सुरुवातीस सिडकोतील खांडेनगरच्या सिद्धिविनायक कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या गॅलरीचा दरवाजा तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली.याबाबत अंबड पोलीसत नोंदही करण्यात आली मात्र या चोरीचा तपास लागू शकलेला नाही.सिडको परिसरात घरफोडी तसेच सोनसाखळी चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडलेला असताना या घटनांच्या तपासाची तत्परता मात्र पोलिसांना दाखविता आली नाही. शासनाच्या पोर्टलवर दाखल झालेली तक्रार अंबड पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर शासनाला लागलीच उत्तर द्यावे लागत असल्याने पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र पोलीस ठाणे पातळीवर दाखल झालेल्या तक्रारींची फारशी दखल घेतली जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयPoliceपोलिस