प्रथमोपचार करताना तत्परता दाखवावीसुभाष यादव : ‘अपनों की जान बचाईयें’ विषयावरील व्यनाशिक : सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकदा लहान-लहान चुकांमुळे अपघात होतात व निष्कारण मृत्यूच्या घटना वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, संकटाच्या वेळी मदत करून प्रथमोपचार करण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असून, समाजात विशेषत: तरुणाईमध्ये याविषयी जागृती होणे अत्यावश्यक आहे. प्रथमोपचार करताना वेळमर्यादेचे पालन करत तत्परता दाखविल्यास निष्कारण मृत्यूच्या घटना टाळता येतील, असे प्रतिपादन ‘प्रथमोपचार संजीवनी’ पुस्तकाचे लेखक डॉ. सुभाष यादव यांनी केले.नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा व महिला संघटनेच्या वतीने परशुराम साईखेडकर सभागृहात आयोजित ‘अपनों की जान बचाईयें’ या व्याख्यानामध्ये प्रमुख वक्ते म्हणून यादव बोलत होते. दरम्यान, अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप बूब, डॉ. प्रभा यादव, जयप्रकाश जातेगावकर, शोभना बूब, रामविलास बूब आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी यादव यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रथमोपचार ही काळाची गरज या विषयावर बोलताना सांगितले की, दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणे ही अत्यंत गौरवास्पद व सामाजिक बांधीलकी जोपासणारी बाब आहे; मात्र यावेळी स्वत:ची सुरक्षिततादेखील विचारात घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या ठिकाणी अपघात घडल्यास जखमीला गर्दीतून तत्काळ बाजूला घेऊन जाणे. जेणेकरून मोकळी हवा मिळेल व त्याद्वारे प्राणवायू उपलब्ध होण्यास मदत होईल, ही प्रथोमपचारामधील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मानवाच्या शरीरामधील एकूण अवयवांपैकी मेंदू हा अत्यंत नाजूक अवयव असून मेंदूला चार मिनिटे जर प्राणवायू मिळाला नाही तर त्याचे कार्य बंद पडते परिणामी मृत्यू संभवतो. (प्रतिनिधी)ाख्यानात प्रतिपादन