शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मीळ झुडुपांच्या लागवडीसाठी ५१५ खड्डे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:28 IST

येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.

ठळक मुद्दे‘आपलं पर्यावरण’ संस्थेकडून २७ प्रजातींचा शोध; जैवविविधता जोपासण्याचा प्रयत्न

नाशिक : वृक्षारोपण करून वाऱ्यावर न सोडता किमान पाच वर्षे त्याच्या संवर्धनाची हमी घेऊन त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवणाºया आपलं पर्यावरण संस्थेने मागील चार वर्षांपासून शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प हाती घेतले आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या हजारो रोपट्यांची दमदार वाढ झालेली आज दिसून येते. येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर म्हसरूळ शिवारातील वनराईवर २७ प्रजातींच्या दुर्मीळ झालेल्या झुडुपांच्या ५१५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये फिरून झुडुपांची रोपे संस्थेने मिळविली आहेत.सातपूर शिवारातील वनविभागाच्या जागेवर देवराई विकसीत करण्यासाठी चार वर्षांपूर्वी लोकसहभागातून ११ हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. या रोपांची दमदार वाढ झाली असून, मागील वर्षी येथे संस्थेने भर टाकली ती नामशेष होणाºया दुर्मीळ रानवेलींची. जैवविविधता विकसित करून परिपूर्ण देवराई अन् वनराई साकारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी सांगितले.यावर्षी म्हसरूळ येथील वनराईचा तिसरा वाढदिवस अर्थात वचनपूर्ती सोहळा जागतिक पर्यावरणदिनी साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्ताने दुर्मीळ अशा २७ प्रजातींच्या जंगली झुडुपवर्गीय रोपांची लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या आगारामधील जागेत तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून वनमहोत्सवांतर्गत साडेसहा हजार रोपट्यांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे.या प्रजाती मिळविण्यास यशफंगला, दिंडा, हेंकल, सर्पगंधा, अश्वगंधा, पत्री निरगुडी, मुरूडशेंग, पांढरा कुडा, तांबडा कुडा, दुरंगी बाभूळ, अरणी, अग्निमंथ, भारंगी, ढायटी, चार प्रकारची कोरांटी, संकुपी, गिडेसा, कपवासी, हिंगणबेट, मेहंदी, काळी निरगुडी अशा विविध प्रजातीचे दुर्मीळ झुडुपवर्गीय वनौषधी रोपट्यांची लागवड जागतिक पर्यावरण दिनी वनराई येथे केली जाणार आहे.समृद्ध निसर्ग परिचय केंद्र उभारण्याचा प्रयत्नपुढील पाच वर्षांमध्ये शहराच्या या दोन टोकांना निसर्गप्रेमींना आगळेवेगळे समृध्द असे निसर्ग परिचय केंद्र देवराई, वनराईच्या रूपाने उपलब्ध होणार आहे. यासाठी आपलं पर्यावरण संस्थेने विडा उचलला असून लोकसहभागातून गायकवाड यांच्यासह संस्थेचे स्वयंसेवक अथक परिश्रम घेत आहेत. भारतीय प्रजातीची झाडे, झुडुपे, वेलींची लागवड व संवर्धनाने परिपूर्ण असे छोटेखानी जंगल विकसीत झाल्यास किटकांपासून पक्षी, प्राण्यांपर्यंत जैवविविधताही जोपासली जाण्यास मदत होणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती