शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात अनधिकृत बांधकामविरोधी मोठ्या मोहीमेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 15:38 IST

प्रशासनाकडून संकेत : स्वत:हून बांधकाम काढून घेण्याचे नागरिकांना आवाहन

ठळक मुद्देगेल्या आठ ते दहा दिवसांपासून रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटणा-या हॉकर्स, विक्रेत्यांविरूद्ध जोरदार मोहीमसामासिक अंतरातील अनधिकृत, पक्क्या व कच्च्या स्वरु पाची बांधकामे,अतिक्र मणे, शेड, ओटे, टप-या आदी हटविण्याची कारवाई हाती घेणेत येणार आहे

नाशिक - महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील रस्ते मोकळे करण्यास सुरूवात केलेली असतानाच वर्दळीचे आणि विकास योजेनंतर्गत येणा-या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांविरोधीही मोहीमेची तयारी चालविली आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जाण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत.महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयामार्फत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून रस्त्यांवर अनधिकृतपणे व्यवसाय थाटणा-या हॉकर्स, विक्रेत्यांविरूद्ध जोरदार मोहीम उघडण्यात आलेली आहे. त्यातून विक्रेत्यांनी केलेली पक्की बांधकामे, शेडस् हटवतानाच त्यांचे साहित्यही जप्त केले जात आहे. त्यामुळे, शहरातील प्रमुख बाजारपेठेतील अनेक रस्ते मोकळे होण्यास मदत होत आहे. महापालिकेमार्फत ही मोहीम सुरू असतानाच मंजूर रस्त्यांलगत, सामासिक अंतरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालविण्याची तयारी आरंभली आहे. त्यानुसार, नगररचना विभागाकडील प्रलंबित प्रकरणे तपासून तत्काळ अतिक्रमण विभागाकडे रवाना करण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे समजते. महापालिकेकडून शहरातील मुख्य व दाट वर्दळीचे रस्ते, चौक, फुटपाथ आदी ठिकाणावरील सर्व प्रकारच्या नियमित बांधकामांव्यतिरिक्त सामासिक अंतरातील अनधिकृत, पक्क्या व कच्च्या स्वरु पाची बांधकामे,अतिक्र मणे, शेड, ओटे, टप-या आदी हटविण्याची कारवाई हाती घेणेत येणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील वर्दळीचे व मनपा विकास योजनेअंतर्गत येणारे ६ ते ३० मीटर रस्त्यांवरील अथवा रस्त्यास, रहदारीस बाधीत होणारे सर्व प्रकारचे अनधिकृत बांधकामे यांचेवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.

गुन्हे दाखल करण्याचा इशारा

नागरिक, व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकामे स्वत:हून तात्काळ काढून घ्यावीत अन्यथा मनपामार्फत कोणत्याही क्षणी पूर्वसुचना न देता सदरची अनिधकृत बांधकामे काढून टाकण्यात येतील व अतिक्र मणे हटविणेसाठी येणारा संपूर्ण खर्च हा संबंधीतांकडून वसूल करणेत येईल, असे कळविण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार संबंधीतांविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका