शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

ओझरच्या खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:56 IST

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य ...

ठळक मुद्देविलोभनीय सोहळा : ग्रामपालिकेकडून तयारी, मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई

ओझर : ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवास येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता भव्य रूप धारण करत चार ते पाच दिवस भरते. यावर्षीही आजपासून सात डिसेंबरपर्यंत यात्रा भरणार आहे. त्यानिमित्ताने ओझर ग्रामपालिकेकडून संपूर्ण दुकानाची जागा वाटप जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतकडून करून देण्यात येणार असल्याचे ग्रामपालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस स्टेशन कडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रौत्सवात पहिल्या दिवशी विश्वस्तांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतात. त्यानंतर षष्ठीपर्यंत श्री मल्हार माहात्म्य या ग्रंथाचे पारायण होते. प्रत्येक दिवशी चढत्या क्र माने मूर्तीवर पुष्पमाला चढविण्यात येणार आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी पारायणाच्या व्रताची सांगता होऊन पहाटे पुजारी व मान्यवरांकडून महापूजा करण्यात येणार आहे. महापूजेनंतर श्री खंडोबारायाच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लावण्यात येणार आहे.तर पहिल्या दिवशी हवेत भंडारा उधळून आख्खं गाव पिवळं होतं. बाणगंगेच्या नदीचे दर्शन करून अश्व पुढे मंदिराकडे नेला जातो. खंडेराव महाराजांचा जयघोष करत कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा,मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार- गवळी, रास्कर, भडके, कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी मल्हाररथ असे अश्वाच्या मदतीने बारा गाडयांना देवाचा हा वारू जोडुन गोरज मुहुर्तावर हे बारा गाडे ओढून यात्रेला सुरूवात होणार आहे. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दी करतात. भंडाऱ्याची उधळण व सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमणार असून यात्रेच्या दुसºया दिवशी भाविक खंडेरावाच्या दर्शनाला गर्दी करतात.-----------------------------मंगळवारचा आठवडे बाजार राहणार बंद.ओझर येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार यात्रेमुळे बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणत उलाढाल होत असल्याने सर्वच गावातून नागरिक येथे येत असतात. त्यामुळे येणाºया मंगळवारी आठवडे बाजार भरणार नसल्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.------------------------------कलात्मक रथ अन् भाविकांचे आकर्षणओझरच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असते. सुबक कलाकृती, जुन्या पिढीतील सुतारकामाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे रथ होय. या रथांची रचना बैलगाडीप्रमाणे असते. चाके, धुर्या, साटा, जू ही मूळ बनावट गृहीत धरतच त्याची घडण म्हणजे हा रथ असतो. मध्यभागी नक्षीदार स्तंभ त्याला चारही बाजूंनी पीळ देऊन दोऱ्यांनी ताण देतात. अलिकडे गजांचा वापरही मोठ्या प्रमाणात केलेला असतो. स्तंभावर बैलगाडीचे चाक चढवून ते आडवे फिरेल असे बसवतात. चाकावर चार चोपा काटकोनात लावतात व या चोपांना आठ सोटगे खालून जोडतात. तिच्या दोन बाजूंना वांगे व पपईत गज कलात्मकरितीने टोचतात. हे रथ जाताना प्रौढांकडे नियोजनाचे तर वयोवृद्धांकडे मार्गदर्शनाचे काम असते. सजवलेली बैलजोडी रथाला जोडण्यात येते. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो.

टॅग्स :Nashikनाशिक