शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वावी ते श्रीक्षेत्र मढी पदयात्रेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:20 IST

रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.

वावी : रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी (अहमदनगर) येथे भरणाºया श्री कानिफनाथ महाराज यांच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.२) नाथभक्त मढीच्या दिशेने प्रस्थान करणार असून, यानिमित्त तयारी करण्यात येत आहे.  वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराजांची श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. रंगपंचमीच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी दरवर्षी धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात वावी येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. सुमारे ७०० नाथभक्त पायी दिंंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या शुक्रवारी निघणाºया पदयात्रेची तयारी सुरू असून, यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. पापमोचनी एकादशी (दि. १३ ) ते फाल्गुन चतुदर्शी (दि. १६) पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन घेता येणार आहे.सुमारे ४५ वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या १५ वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव मार्गे जाणाºया पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदी वाहने असतात.  गुरुवारी (दि. १) सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखीचे पूजन करण्यात येणार असून, सायंकाळी ६ वाजता कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (दि. २) सकाळी रथाचे मढीच्या दिशेने प्रस्थान होईल.  रंगपंचमीच्या दिवशी श्रीक्षेत्र मढी येथे भरणाºया यात्रेला महाराष्टÑातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणूक काढून काठीला कळसाचे दर्शन घडवले जाते. वावी पदयात्रा समितीने मढी येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून, या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त विसावतात. पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदी गावांसह गावोगावी रथाचे पूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. प्रत्येक गावातील गावकरी जल्लोषात स्वागत करतात. पदयात्रेनिमित्त वावी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.यावर्षी समाधीमंदिर चार दिवस खुलेभटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीक्षेत्र मढी येथील यात्रोत्सव होळी ते गुढीपाडवा असा पंधरा दिवस असतो. रंगपंचमी व गुढीपाडवा या दोन दिवशी मोठी यात्रा भरते. यापूर्वी केवळ गुढीपाडव्याच्या दिवशी भाविकांना गाभाºयात जाऊन समाधीचे दर्शन घेता येत होते. त्यामुळे मोठी गर्दी होत असे. भाविकांना समाधीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी समाधी मंदिर चार दिवस खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक