शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:30 IST

बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

नाशिकरोड : बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे.  गणेशोत्सवापाठोपाठ पितृपक्ष पंधरवाडा सुरू झाला असून १० आॅक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार आहे. अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रीमुळे युवा वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध देवी मंदिरात साफसफाई, स्वच्छता, रंगरंगोटी, मंडप उभारणी आदि कामांच्या तयारीला सुरूवात झाली आहे.  सार्वजनिक मंडळाकडून देखील नवरात्रोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत असून त्या दृष्टीने तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. मंडप टाकणे, दांडीया-गरबा खेळण्यासाठी जागा सपाटीकरण करण्याचे नियोजन केले जात आहे.  दांडीया-गरबा खेळण्यासाठी गर्दी व्हावी म्हणून नवरात्रोत्सव मंडळाकडून विविध स्पर्धा, बक्षिसे ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर गृहिणी वर्गाकडून देखील घरातील कामे करण्यास वेग आला आहे.कार्यकर्त्यांमध्ये चिंतायावर्षी गणेशोत्सवात डिजेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्यात आल्याने नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दांडीया-गरबासाठी डीजे न लावल्यास गर्दी होणार की नाही या प्रश्नाने कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी वाढली आहे.दांडीया-गरबासाठी काही मंडळांनी बॅन्जो पार्टी, आॅर्केस्ट्रा व गुजराथी ढोल पथक बुक केले आहेत. नवरात्रोत्सव जसा जसा जवळ येत आहे तशी युवा पिढीची उत्सुकता वाढु लागली आहे. देवी मंदिरांमध्ये नवरात्रीच्या तयारीमुळे उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक