नाशिक : रविवारी दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अक्षरश: पाण्यात गेली. पावसामुळे सभेच्या ठिकाणी अनेक मनोरे कोसळले, बॅनर्स फाटले. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, या पावसाचा फटका शहरवासीयांनाही बसला.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात असलेल्या असह्य उकाड्यानंतर रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. सायंकाळी ५ च्या सुमारास सुरू झालेल्या या पावसाने शहरातील जवळपास सर्वच भागाला झोडपल्याने अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अचानक आलेल्या जोरदार पावसाने झोडपल्याने नागरिकांची धावपळ झाली. तपोवन परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी पाणी साचून चिखल झाला. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पादचारी आणि वाहनधारकांना आडोशाचा आधार घ्यावा लागला, तर रस्त्यावरील विक्रेत्यांना सामानाची आवरासावर करावी लागली.
नरेंद्र मोदींच्या सभेची तयारी अक्षरश: पाण्यात
By admin | Updated: October 6, 2014 00:57 IST