शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व मतदारसंघात निवडणूक यंत्रणेची सज्जता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 18:57 IST

नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे

ठळक मुद्देपावसात साहित्याचे वाटप : मतदान केंद्रे तयारमतदानासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. भर पावसातही मोठ्या उत्साहाने निवडणूक कर्मचाºयांनी आपल्या पथक प्रमुखासह हजर राहून निवडणुकीसाठी लागणारे साहित्य काळजीपूर्वक ताब्यात घेतले. मतदान साहित्यानिशी अधिकारी, कर्मचारी दुपारनंतर मतदान केंद्रावर रवाना झाले असून, त्यानंतर मतदान कक्षाची सज्जता पूर्ण करण्यात आली आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात तीन लाख ५४ हजार ३०३ मतदार असून, त्यात एक लाख ८४ हजार ७०७ पुरुष तर एक लाख ६९ हजार ५९२ महिला मतदारांचा समावेश असून, मतदारांसाठी ३११ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असून, रविवारी सकाळी आठ वाजेपासून पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचा-यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यासाठी हजारो कर्मचा-यांनी याठिकाणी हजेरी लावली. मतदान प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, शाई, व्हीव्हीपॅट, ईव्हीएम मशीन, मतदान कक्ष, पांढरी पावडर, टाचण्या, सुतळी, मेणबत्ती आदींसह अन्य निवडणूक साहित्याचे मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदान साहित्य वाटपात अडथळा नको म्हणून क्रीडा संकुलात दोन ठिकाणी मंडप उभारणी करण्यात येऊन जमिनीवर चटई टाकण्यात आली होती. तर मुख्य संकुलाच्या आवारात निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांना बसण्यासाठी चटई तसेच खुर्च्यांची व्यवस्था केली होती. साहित्य घेण्यासाठी आलेल्या कर्मचा-यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. मतदान साहित्य वाटप करण्यात येणार असल्यामुळे सकाळपासून क्रीडा संकुलात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान साहित्य घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने कर्मचारी क्रीडा संकुलात रांगेने दुपारपर्यंत उभे होते. मतदान साहित्याचा ताबा घेतल्यानंतर मतदान कर्मचारी, अधिका-यांनी क्रीडा संकुलाच्या आवारातच जेवणासाठी आणलेले डबे खाल्ले. मतदान साहित्य व कर्मचा-यांना वाहून घेण्यासाठी एस.टी. बस व खासगी वाहनांची सोय करण्यात आली होती. दरम्यान मास्टर ट्रेनर उद्या सोमवारी पहाटेपासून पूर्ण पंचवटी विधानसभा मतदारसंघात फिरून मशीनमध्ये अडचण निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी मदत करणार आहे. या पथकात बारा कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक