शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचावर कारवाईसाठी आंदोलनाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:41 IST

मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची केलेली तयारी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावी लागली आहे. सदर सरपंचावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरले.

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमताने ग्रामपंचायतीच्या कामात गैरव्यहार केला असून, त्यासंदर्भातील तक्रारी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्याची केलेली तयारी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घ्यावी लागली आहे. सदर सरपंचावर लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरले.दाभाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच चारूशिला अमोल निकम यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत मंजूर शौचालय अनुदानामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सदस्यांनी केला असून, अनेक शौचालयांची कामे अपूर्ण असूनही निधी काढण्यात आलेला आहे. शौचालयाचे कामे निकृष्ट असून, काही लाभार्थ्यांच्या खात्यावरील अनुदान परस्पर काढून घेण्यात आले आहे. त्याचबरोबर अमरधाममध्ये कॉँक्रीट रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. मराठी शाळेला पत्रे बसविणे, बाजारपेठेत पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामांना मासिक बैठकीत मंजुरी न घेता त्याच्या कामाचे परस्पर वाटप करणे, मासिक सभेमध्ये बहुतांशी सदस्यांनी या कामाची निविदा रद्द करण्याची मागणी केलेली असतानाही ती निविदा रद्द न करणे अशा स्वरूपाचा बेकायदेशीर कारभार केला जात असून, त्याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याचे जिल्हा परिषद सदस्या संगीता संजय निकम यांनी निवेदनात म्हटले आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाची तयारी सुरू केली होती.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन