शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक, दुष्काळ निवारणाला प्राधान्य : सुरज मांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:54 IST

नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा काळ पाहता आगामी काळात लोकसभा निवडणुकीची तयारी व दुष्काळ निवारण या दोन्ही गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक : नूतन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कामकाजाला प्रारंभ केला असून, सध्या निवडणुकीचा काळ पाहता आगामी काळात लोकसभा निवडणुकीची तयारी व दुष्काळ निवारण या दोन्ही गोष्टींना अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदावरून नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झालेल्या मांढरे यांचे मंगळवारी रात्रीच नाशकात आगमन झाले. सकाळी साडेदहा वाजता त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्णापुढील महत्त्वाचे विषय जाणून घेतानाच लोकसभा निवडणुकीची तयारी जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य सरकारच्या सेवेत २९ वर्षे गेली असल्यामुळे कोणताही विषय आपल्यासाठी नवीन नसल्याचे सांगून, सध्याची परिस्थिती पाहता, तोंडावर आलेली लोकसभा निवडणूक व जिल्ह्णातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून या दोन्ही विषयांना आपण प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.‘सेवा हमी कायद्या’ची काटेकोर अंमलबजावणीला आपण प्राधान्य देणार असून, कोणताही विषय वा प्रश्न सोडवणुकीसाठी किती वेळ लागेल याची मर्यादा सर्वांना ठरवून द्यावी लागेल, असे सांगून पुणे येथे २५७ सुविधा आपण जनतेला उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचबरोबर ‘पब्लिक डिलिव्हरी सिस्टीम’अधिकाधिक बळकट करण्याबरोबरच, डिजिटलायझेशन व सरकारी यंत्रणेकडे कामे घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी ‘व्हिजिटर ट्रॅक’पद्धत लागू करण्यात येईल, त्याचबरोबर त्यांचे समाधान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. लवकरच प्रत्येक खाते प्रमुखाची बैठक घेऊन त्यांच्याकडील कामे जाणून घेण्याबरोबरच, कर्मचाऱ्यांकडूनही आपण माहिती घेणार असून, ज्यांच्याकडे निवडणुकीचे काम नसेल अशांनी निवडणूक कामाच्या आड दैनंदिन कामे नाकारू नये अशा सूचना आपण अधिकाºयांना दिल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक