शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात पावसाचा हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 14:13 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात गुरूवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून जणू काही ढगफूटीप्रमाणे तीन ते चार तासापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पुर्व भागात गुरूवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून जणू काही ढगफूटीप्रमाणे तीन ते चार तासापासून पडलेल्या जोरदार पावसामुळे अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य या परिसरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे अस्वली स्टेशनमध्ये पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे हाल झाले असून पुराचे पाणी घरांमध्ये घुसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.  इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुर्हे, गोंदे दुमाला, जानोरी आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. अस्वली व नांदूरवैद्य परिसरातील नदी, नाले, ओंडओहोळ तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे येथील जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे.अस्वली स्टेशन येथील रेल्वे स्थानकात व रेल्वे लाईनमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या घोटी तसेच इगतपुरी येथे थांबवण्यात आल्या असून संपूर्ण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दुपारी चार वाजेपासून सुरु झालेल्या पावसामुळे येथील परिसर जलमय झाला होता.अस्वली स्टेशन येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक भयभीत झाले होते.पावसाने लावलेल्या या जोरदार हजेरीमुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला, भात, मका, टॉमेटोचे प्रचंड नुकसान झाल्याचे परिसरातील शेतकर्यांनी यावेळी माहीती देतांना सांगितले.नांदूरवैद्य व बेलगाव कुर्हे येथील रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे घोटी तसेच इगतपुरीशी संपर्क तुटला होता.

टॅग्स :Nashikनाशिक