शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण

By admin | Updated: June 30, 2014 00:27 IST

शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण

 

वाजगाव, देवळ्यात कृषी विभागाचा उपक्रमदेवळा : तालुका कृषी विभागातर्फे वाजगाव येथे शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्व प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येथील मारुती मंदिरात यानिमित्ताने बैठक घेण्यात आली. कृषी पर्यवेक्षक एन. एन. जाधव यावेळी उपस्थित होते. कृषी सहाय्यक सुवर्णा पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कृषी विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेततळे डाळींब लागवड शेतीउपयोगी अवजारे, पॅकिंग हाउस आदि योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. वाजगाव येथे गारपिटीमुळे पीक उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. याविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. यासाठी सर्व अनुदानपात्र शेतकऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात येऊन उपस्थितांचे शंका समाधान करण्यात आले. गावात कृषी विभागाची शेतकऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी इमारत आहे. परंतु गेल्या १५ वर्षांपासून या जागेवर वाजगाव वि.का. सोसायटीचे कार्यालय असल्याने ही जागा कृषी विभागाला वापरता येत नाही. यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. कृषी विभागातर्फे बियाणे, खते आदिंचे वाटप करण्यात येते. परंतु वाजगाव येथे साहित्य ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते सर्व एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर उतरविले जाते. यामुळे त्याला सुरक्षितता लाभत नाही व अनेक शेतकरी खते, बियाणे आदिंच्या लाभापासून वंचित राहतात. त्यासाठी कृषी विभागाचे कार्यालय असणे गरजेचे आहे. सोसायटीकडे ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकवेळा कृषी विभागाची जागा खाली करून देण्याबाबत मागणी केली आहे. (वार्ताहर)परंतु वाजगाव सोसायटी ती जागा सोडण्यास तयार नाही. कृषी विभागाने ही जागा सोसायटीकडून ताब्यात घेऊन तेथे कृषी विभागाचे कार्यालय व गुदाम सुरूकरावे म्हणजे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीस ग्रामपंचायत सदस्य विनोद देवरे, सुनील देवरे, विष्णू देवरे, अशोक गोराणे, वैजीनाथ देवरे, भाऊसाहेब देवरे, बापू वन्से, सोसायटीचे संचालक संजय गायकवाड, अशोक देवरे, अरुण महाले, बापू देवरे, बाळासाहेब खैरनार, सीताराम देवरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)