शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धन्वंतरी पूजन करून आरोग्यासाठी प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:16 IST

आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून सर्व रुग्णांसह नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली.

नाशिक : आश्विन कृष्ण त्रयोदशीला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचे शहरातील विविध आयुर्वेद रुग्णालये, महाविद्यालयांसह अन्य पॅथी रुग्णालये व महाविद्यायांसोबतच स्वतंत्ररीत्या आयुर्वेद उपचार करणाऱ्या वैद्यांनी श्रद्धेने पूजन करून सर्व रुग्णांसह नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना केली.  शहरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सुशीला चिकित्सालय आयुर्वेद केंद्र येथे भगवान धन्वंतरींचे पूजन व आरती केली. यावेळी एक्सरे तज्ज्ञ डॉ. राजेंद्र खाडे व आयुर्वेद केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी व अध्यापकांनी आयुर्वेदाशी संबंधित विविध ग्रंथांसह वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे मंत्रोच्चाराच्या माध्यमातून पूजन केले. तसेच मंत्रोच्चार पठण करतानाच ब्रह्मवृंदांनी यज्ञकुंडात भगवान धन्वंतरींना आहुती अर्पण करून पूजन केले. गणेशवाडीतील आयुर्वेद महाविद्यालयातही धन्वंतरी पूजन करून तृतीय राष्ट्रीय आयुर्वेद दिवस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयुर्वेद सेवा संघ व आयुर्वेद व्यासपीठ, आरोग्य भारती नाशिक, जिल्हा आयुर्वेद संमेलन यांच्यातर्फे आयुर्वेद सेवा शरद पाठक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वैद्य अभय कुलकर्णी, वैद्य शंकरलिंगम दासरी, वैद्य राजेंद्र खरात, वैद्य विजय भोकरे, वैद्य कमलेश महाजन, वैद्य एकनाथ कुलकर्णी व वैद्य देवेंद्र बच्छाव आदी उपस्थित होते. यावेळी भगवान धन्वंतरींच्या विविध प्रतिमांचे व प्रार्थनांचे सादरीकण सुचिता पांडे यांनी केले. त्यानंतर वैद्य शशिताई आहिरे, वैद्य रमेश भट, वैद्य निला भट, वैद्य निलांबरी शुक्ल व वैद्य वसंतराव गर्गे यांचे औक्षण करून त्यांना औषधी वनस्पती व आयुर्वेद पत्रिका भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अष्टांगहृदय या आयुर्वेदीय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले. त्याचप्रमाणे सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयातही धन्वंतरी जयंतीनिमित्त भगवान धन्वंतरीचे वैद्य परशुराम पवार यांनी प्रतिमापूजन के ले. तसेच आयुर्वेद ग्रंथांचेही यावेळी पूजन करण्यात आले. वैद्य अपर्णा राऊत, वैभव फरताळे, प्रीती दासरी आदी उपस्थित होते.संदर्भ सेवा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी संदर्भ रुग्णालयात ५० हजार रुग्णांचे सीटी स्कॅन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाºयांचा आमदार देवयांनी फरांदे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक स्वाती भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे, एक्सरे तज्ज्ञ डॉ. मंगेश थेटे उपस्थित होते.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिकhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर