शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या नाशकात प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीते

By admin | Updated: February 16, 2017 23:26 IST

उमेदवारांची शक्कल : परिसर बदलला की ‘धून’ही बदलते

 नाशिक : निवडणुकीचा माहोल रंगात आला असून, उमेदवारांकडून प्रभाग पिंजून काढण्यासाठी जिवाचे रान केले जात आहे. बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिल्याने मतदारांपुढे स्वत:ची छाप पाडण्यासाठी उमेदवार विविध शक्कल लढवित आहेत. जुन्या नाशकात प्रचारात चक्क कव्वाली अन् भक्तिगीते वाजविली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांकडून प्रचारावर सर्वाधिक भर दिला जात आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बॅँकेतून रक्कम काढण्यावर मर्यादा जरी असली तरी ‘होऊ द्या खर्च...’ या उक्तीनुसार काही उमेदवार कामाला लागले आहेत. आचारसंहिता भरारी पथकांच्या वाहनांसोबतच विविध पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाररथही प्रभागातून गतिमान झाल्याचे चित्र आहे. प्रचार फेऱ्या काढून मतदारांचे लक्ष वेधण्याचा उमेदवार प्रयत्न करत असून, दुसरीकडे जुन्या नाशकात तर चक्क प्रचाररथांवर ‘एलईडी वॉल’ लावून प्रचार केला जात आहे. उमेदवाराची ‘ओळख’ अन् ‘आवाहन’ झाल्यानंतर मुस्लीम बहुल भागात वाहन असेल तर कव्वालीची ध्वनिफीत आणि हिंदू बहुल भागातून वाहन जात असेल तर भक्तिगीते वाजवून मतदारांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. प्रचारात कव्वाली अन् भक्तिगीतांचे संगीत सध्या जुन्या नाशकात चर्चेचा मुद्दा आहे. दाट लोकवस्ती, हिंदू-मुस्लिमांचा एकोपा अशी जुन्या नाशिकची थोडक्यात ओळख. जुन्या नाशिकने महापालिकेत अनेकदा नेतृत्व पाठविले; मात्र या भागाचा गावठाण परिसर आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. निवडणुका येतात आणि उमेदवारांकडून आश्वासन नव्हे तर चक्क ‘स्मार्ट जुने नाशिक’असे कायापालटचे स्वप्न दाखविले जाते; मात्र मतदानानंतर परिस्थितीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र निर्माण होते, अशी खंत येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.