शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

माघारी नाट्यात प्रतापदादा सोनवणेंची बंडखोरी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:56 IST

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची दमछाक करीत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाचा हिरमोड झाला.

नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी त्यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची दमछाक करीत आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाचा हिरमोड झाला. अर्ज माघारीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रकाश सोनवणेंसह आठ जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात १६ उमेदवार राहिले आहेत.  नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अंतिम मुदत होती. इच्छुक असलेले प्रतापदादा सोनवणे  यांना भाजपाने उमेदवारी नाकारून अनिकेत विजय नवल पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या सोनवणे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकावत अखेरच्या दिवशी अर्ज भरून पक्षाला जोरदार धक्का दिला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सोनवणे यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी सोनवणे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याबरोबरच विविध महामंडळांचे अध्यक्षपदाचे आमिषही दाखविण्यात आले होते. सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्यासह आमदार बाळासाहेब सानप, संघटनमंत्री किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, अनिल भालेराव आदी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे सोनवणे हे माघार घेण्याची चर्चा होत असताना, भाजपाच्या पदाधिकाºयांनी सोनवणे यांचा माघारीचा अर्जही तयार केला. या सर्व पदाधिकाºयांशी एकीकडे चर्चा करीत असताना, दुसरीकडे सोनवणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे जाऊन आपली उमेदवारी कायम असल्याचे सांगितले व माघार घेण्यास नकार दिला. अखेर माजी मंत्री विजय नवल पाटील यांनीदेखील सोनवणे यांच्याशी चर्चा करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र सोनवणे निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत संपून गेली. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाºयांनी विभागीय आयुक्त कार्यालयातून काढता पाय घेतला.सोळा उमेदवार रिंगणातटीडीएफचे भाऊसाहेब नारायण कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील, टीडीएफ व शिवसेना पुरस्कृत किशोर भिकाजी दराडे, टीडीएफचे संदीप त्र्यंबकराव बेडसे, माजी खासदार प्रताप नारायण सोनवणे, विलास शांताराम पाटील, शालिग्राम नामदेव भिरूड, बाबासाहेब संभाजी गांगुर्डे, अमृत ऊर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, रवींद्र भिवाजी पटेकर, महादेव साहेबराव चव्हाण, शेख मुक्तार अहमद मोहम्मद कासिक, अजित किसन दिवटे, सुनील पांडुरंग पंडित, विठ्ठल रघुनाथ पानसरे, अशोक शंकर पाटील हे सोळा उमेदवार रिंगणात आहेत.आचारसंहितेची ऐसी की तैसीविभागीय आयुक्त कार्यालयात माघारीच्या निमित्ताने आचारसंहितेचा पावलोपावली भंग करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या स्वीय सहायकाच्या समोर बसून भाजपाचे पदाधिकारी राजकीय चर्चा करण्यात व्यस्त होते, तर याच ठिकाणी बसून प्रतापदादा सोनवणे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माघारीबाबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधत होते. माजी मंत्री विजय नवल पाटील व प्रतापदादा सोनवणे यांच्यातील बैठकदेखील विभागीय आयुक्त कार्यालयातच झडल्याने साºयाच राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू विभागीय आयुक्त कार्यालय झाले होते. याठिकाणी उघड उघड आचारसंहिता भंग होत असताना त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाने मात्र ‘नरो वा कुंजरोवा’ची भूमिका घेतली.बुद्धीला जे पटले तेच केले : सोनवणेभाजपाचे बंडखोर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी ‘बुद्धीला जे पटले तेच केले’ असे सांगून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले. भाजपातील जुने मित्र, सहकारी उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यास आले होते. मुख्यमंत्र्यांचा फोन हवापाणी विचारण्यासाठी आल्याचे ‘मार्मिक’ उत्तर सोनवणे यांनी दिले, तर आमदार बाळासाहेब सानप यांनी आम्ही किती जणांची माघारी झाली याची माहिती घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. योगायोगाने कार्यालयाच्या आवारात सोनवणे यांची भेट झाल्यानंतर त्यांना तुम्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात म्हणून उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केल्याचे सानप यांनी सांगितले.आठ जणांची माघारउमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे प्रकाश हिला सोनवणे, दिनेश अभिमन्यू देवरे, सुरेश पांडुरंग पाटील, सुनील धोंडू फरस, महेश भिका शिरुडे, सुनील रमेश बच्छाव, कुणाल नरेंद्र दराडे, गजानन काशीराम खराटे या आठ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे सोनवणे यांना २००६च्या निवडणुकीत दुसºया क्रमांकाची मते मिळाली होती.

टॅग्स :Electionनिवडणूक