शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

प्रताप दिघावकरांनी अल्पावधीतच जिंकली शेतकऱ्यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST

------ प्रदीर्घ सेवेतून निवृत्त : बुडीत निघालेली 11 कोटींची वसुली करण्यास पोलीस यंत्रणेला यश ---- नाशिक : अल्पावधीतच ...

------

प्रदीर्घ सेवेतून निवृत्त : बुडीत निघालेली 11 कोटींची वसुली करण्यास पोलीस यंत्रणेला यश

----

नाशिक : अल्पावधीतच नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. त्यामुळे अल्पावधीतच नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सुमारे साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलीस यंत्रणेला यश आले. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी. दिघावकर हे आपल्या प्रदीर्घ पोलीस सेवेतून शुक्रवारी (दि.३0) निवृत्त झाले. स्वतः शेतकरी असलेले दिघावकर हे काही महिन्यांतच शेतकऱ्यांचे ‘हीरो’ बनले.

दिघावकर यांनी सप्टेंबर २०२० साली नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची सूत्रे तत्कालीन आयपीएस अधिकारी छेरिंग दोरजे यांच्याकडून स्वीकारली.

यानंतर त्यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणावर भर देणार असल्याचे म्हटले आणि फसवणूक करून पोबारा केलेल्या ‘त्या’ व्यापाऱ्यांना रोखठोक इशारा दिला. यामुळे व्यापाऱ्याचे धाबे दणाणले. शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज तालुका पातळीवरील पोलीस ठाण्यांमधील फायलींत धूळखात पडून होते, त्या सर्व अर्जांवरील धूळ झटकली गेली.

नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी शेतकऱ्यांचे फसवणुकीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या अर्जांची युद्धपातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. परिणामी, सप्टेंबरपासून डिसेंबरअखेरपर्यंत एकूण पाच जिल्ह्यांतून १ हजार १९२ शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे गाऱ्हाणे अर्जातून मांडले. यापैकी १ हजार १६१ अर्ज केवळ नाशिक ग्रामीणमधून आले आहेत. फसवणुकीची एकूण रक्कम ४६ कोटी २० लाख ५२ हजार ४३६ च्या घरात पोहोचली. १९१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले. २०० व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तडजोड होऊन १९९ व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ६ कोटी ७५ लाख ८८ हजार ९८ रुपयांची रक्कम परत केली आहे. ५ कोटी ८४ लाख ४५ हजार ६१० रुपये इतकी रक्कम व्यापारी परत करण्यास तयार झाले आहेत. अशी एकूण १२ कोटी ६० लाख ३३ हजार ७०८ रुपयांची रक्कम वसूल करण्यास पोलिसांना दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली यश आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण असणारा पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला.

----इन्फो----

दिघावकर मूळ नाशिककर

दिघावकर हे मूळ नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र आहे. १९८७ च्या राज्यसेवा आयोगाच्या बॅचचे ते अधिकारी आहेत. जिल्ह्यातील अवैध धंदे, गुटख्याची तस्करी, शस्त्रांची तस्करी जुगाराचे अड्डे, दारूच्या भट्ट्या नाशिक परिक्षेत्र अर्थात उत्तर महाराष्ट्रातून उद्‌ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी सूत्रे हाती घेताच दिले. गुटखामुक्त उत्तर महाराष्ट्र हे अभियानही ग्रामीण पोलिसांचे गाजले.

------इन्फो----

सुशिक्षित बेरोजगारांनाही दिला दिलासा

शेतकरी पुत्र असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार उत्तर महाराष्ट्रातील ३९ सुशिक्षित बेरोजगारांनी केली होती. या तक्रारींनुसार त्यांची २ कोटी ३८ लाख ९० हजार १०० रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी २ तक्रारदार व फसवणूक करणाऱ्यांमध्ये तडजोड झाली आहे, तसेच ११ जणांनी ३७ लाख ३८ हजार रुपये परत केले, तर फसवणूक करणाऱ्यांनी १५ लाख ५७ हजार रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ३० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेरोजगारांना गंडा घातल्याप्रकरणी सर्वाधिक तक्रारी नाशिक ग्रामीण भागातील असून, येथील २२ तक्रारींनुसार त्यांना १ कोटी ४४ लाख ४१ हजार १०० रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

--------इन्फो------

कृतज्ञतेपोटी होर्डिंग झळकावले

नलहोर्डिंग, जाहिरात फलक, कटआऊट म्हटलं की एखादा पुढारी समोर येतो. राजकीय व्यक्ती आणि होर्डिंग्ज यांचे जुने समीकरण आहे. मात्र, जेव्हा एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याचे खाकी वर्दीवरील सचित्र असलेले भले मोठे होर्डिंग शहरातील मुख्य चौकात झळकले आणि हा विषय अधिकच चर्चेचा बनला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा असाच भला मोठा फलकाने नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले होते. एका शेतकारीपुत्राने निनावी हे कृतज्ञतापूर्वक होर्डिंग्ज लावले होते.