वटार : वटारच्या सरपंचपदी प्रशांत बागुल यांची, तर उपसरपंचपदी पोपट खैरनार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार मावळते सरपंच रामदास खैरनार यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सरपंचपदाच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. मंगळवारी सरपंचपदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रशांत बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी ए. एल. धूम यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.नवनिर्वाचित सरपंच प्रशांत बागुल यांची नियुक्ती माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मावळते सरपंच रामदास खैरनार यांचा उपसरपंच पोपट खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून ए. एल. धूम व हर्षद जगताप यांनी काम पाहिले. या निवडणूकप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खैरनार, महाराष्ट्र माळी समाज युवा तालुका अध्यक्ष हरिभाऊ खैरनार, जयवंत आहिरे, मुरलीधर खैरनार, ज्ञानदेव खैरनार, रामकृष्ण खैरनार, फकिरा खैरनार, बळवंत दशपुते, सावित्रीबाई फुले पाणीवाटप संस्थेचे अध्यक्ष बाळू खैरनार, बाळू बागुल, हरीश खैरनार, योगेश बागुल, मच्छिंद्र बागुल, सुरेश खैरनार, संतोष खैरनार, संजय खैरनार, वामन गांगुर्डे, वाल्मीक बागुल, मोठाभाऊ खैरनार, संतोष खरे, विठ्ठल सोनवणे, कडू खरे, प्रल्हाद बागुल, चेतन गांगुर्डे, शेखर खैरनार, संतोष बागुल, खंडू बागुल, डॉ. संजय खैरनार, मनोजसिंग राजवत, रवींद्र बागुल, सतीश खैरनार, नितीन बागुल, जितेंद्र बागुल, जे. पी. खैरनार, राजेंद्र खैरनार, ग्रामसेवक भारत पगार, लक्ष्मण गांगुर्डे, प्रदीप खैरनार, ताराचंद खैरनार, बापू खैरनार, गोरख गांगुर्डे, दिलीप पवार, देवराम पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
वटारच्या सरपंचपदी प्रशांत बागुल
By admin | Updated: November 25, 2015 22:17 IST