नाशिक : पंचवटीतील प्रसाद विक्रेत्याचा मृतदेह सुरगाण्याजवळील उंबरपाडा शिवारात रस्त्यालगत शुक्रवारी (दि़ ३) सकाळी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे़ मयत विक्रेत्याचे नाव मंगेश शालिग्राम पाटील (४२, गल्ली नंबर २, मायको दवाखान्याच्या पाठीमागे, दिंडोरी रोड) असे आहे़ गुरुवारी (दि़ २) रामकुंडाची साफसफाई सुरू असल्याने मंगेश प्रसाद विक्रीची टपरी बंद करून एका साथीदारासमवेत दुचाकीवर बसून गेले होते़ मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत़ नंदा पाटील यांनी संबंधित साथीदारावर संशय व्यक्त केला आहे़ दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली़
प्रसाद विक्रेत्याचा सुरगाण्यात खून
By admin | Updated: February 4, 2017 02:10 IST