शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखासमोर सेना आमदाराचे भाजपाचे गुणगान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:20 IST

नाशिक : शिवसेना भाजपातील धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने जाहीरपणे भाजपाचे गुणगान केल्यामुळे युतीच्या चर्चेला ...

ठळक मुद्देचर्चेला उधाण : ठाकरे-पाटील एकाच वाहनात

नाशिक : शिवसेना भाजपातील धुसफुसीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या समक्ष त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने जाहीरपणे भाजपाचे गुणगान केल्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण येऊन गेले आहे.पिंपळगाव बसवंत येथे आमदारांच्या विकास निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले असता त्यांच्या समक्ष सेना आमदार अनिल कदम यांनी भाजपाचे चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यामुळे सेना-भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून, काहींनी तर कदम हे भाजपाचे कमळ हाती धरणार असल्याची चर्चाही सुरू केली आहे.आमदार अनिल कदम यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन यांना पाचारण करण्यात आले होते. अनिल कदम यांनी, जायकवाडीच्या पाणीप्रश्नाचा उल्लेख करून पालकमंत्रीगिरीश महाजन यांनी दोनजिल्ह्यात योग्य तो समतोल साधत मार्ग काढल्याबद्दल कौतुककेले. (पान ९ वर)तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या साºया अपेक्षा पूर्ण केल्याचे सांगून एक प्रकारे राज्यातील शेतकºयांचे सर्व प्रश्न पाटील यांनी मिटविल्याचे प्रशस्तिपत्र देऊन टाकले. कदम यांनी महाजन व पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळलल्यामुळे ते भाजपाच्या जवळ गेल्याचा अर्थ राजकीय वर्तुळात काढला जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात दररोज राज्य सरकारचे वाभाडे काढले जात असताना कदम यांनी भाजपाच्या मंत्र्यांविषयी जाहिरपणे काढलेल्या गौरवोद्गारामुळे उपस्थित शिवसैनिकांनाही आश्चर्य वाटले. विशेष म्हणजे ओझर विमानतळावर उतरल्यानंतर उद्धव ठाकरे व चंद्रकांत पाटील या दोघांचेही एकाच वाहनातून सभास्थळी आगमन झाले व या दोघांचेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत केल्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलतात यापेक्षाही भाजपा-सेनेच्या युतीचीच चर्चा अधिक घडून आली.