शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नृत्यसाधना कला अकॅडमीतर्फे ‘प्रगती उत्सव-२०१९’ रंगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:25 IST

शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़

ठळक मुद्देकलागुण सादर : कलाकारांना पुरस्कार

नाशिक : शास्त्रीय संगीत नृत्याशी संलग्न असलेली संस्था नृत्यसाधना अकॅडमीतर्फे प्रगती उत्सव २०१९ हा भरतनाट्यम उडिसी नृत्य व नृत्ययोग हा कार्यक्रम रंगला़ तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़नृत्यसाधना अकॅडमीतर्फे महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाकवी कालिदास कलामंदिरात प्रगती उत्सव हा नृत्याविष्कार संपन्न झाला़यावेळी ज्येष्ठ नृत्यांगना देवी बासू यांनी जटायू मोक्ष सादरीकरण केले़ रामायण काळातील या नृत्य सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली़याप्रसंगी अ‍ॅड़ सदाशिवराव देवे पुरस्कार झेलम परांजपे यांच्या स्मितालय संस्थेत भरतनाट्यमचे शिक्षण घेणाऱ्या अंकुर बल्लाळ यांना प्रदान करण्यात आला़ सदर पुरस्कार डॉ़ संगीता पेठकर व दिनेश पेठकर यांच्या हस्ते देण्यात आला़ यावेळी नीलिमा पवार, डोरजे, देवी बासू, उध्दव आहेर, विलास बिरारी, नितीन पवार आदींचा सत्कार करण्यात आला़ त्याचप्रमाणे जननी पुरस्कार मिताली काळे, खुशबू जयन, मध्यमा गुर्जर या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आला़ सदर पुरस्कार सदानंद देवे यांच्या हस्ते देण्यात आला़ तसेच कुसुदिनी पुरस्कार रसिका नातू यांना देण्यात आला़ यावेळी हेमा बासू, अनघा जोशी, पूजा निंबाळकर, योगेश नांदुर्डीकर, अंजली काळकर, समर्थ निकम, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व कलारसिक उपस्थित होते़तबला जुगलबंदीनृत्यसाधना कला अकादमीच्या विद्यार्थिनींनी कृष्णा द सेव्हीयर ही नृत्यरचना सादर केली़ यात प्रामुख्याने कृष्णाची रासलीला, कंसवध, कौरव-पांडव द्यूत या प्रसंगांचा समावेश होता़ तसेच पवार तबला अकादमीचे नितीन पवार आणि शिष्यगणांनी तबला जुगलबंदी सादर करून रसिकांची मने जिंकली़

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक