शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

प्रधानमंत्री आवास योजना; बोगस अर्जांची विक्री

By admin | Published: January 11, 2017 12:49 AM

आयुक्तांकडून दखल : कारवाई करण्याचे आदेश

नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे कामकाज महापालिकेमार्फत केले जाणार असून, त्यासाठी झोपडीनिहाय सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र, सर्वेक्षणापूर्वीच या योजनेच्या बोगस अर्जांची विक्री ५० ते १०० रुपये शुल्क घेऊन केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधितांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.  महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. सदर योजनेंतर्गत महापालिकेमार्फत झोपडीनिहाय व मागणी सर्वेक्षण करण्यात येणार असून, झोपडीनिहाय सर्वेक्षणाकरिता महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्तीची नेमणूक करण्याची प्रक्रिया राबविली आहे. सदर एजन्सीमार्फत झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन विहित नमुन्यात माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी महापालिका स्वतंत्र यंत्रणा राबविणार आहे. अद्याप महापालिकेने सर्वेक्षणाचे काम हाती घेतलेले नाही. परंतु, प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाचे बोगस अर्ज ५० ते १०० रुपयांना विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.  मखमलाबाद नाका येथील महा-ई-सेवा केंद्राच्या नावे सदर अर्ज विक्री होत असून, केंद्रामार्फत अर्ज अपलोड करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदर अर्जासाठी लाभार्थ्यांची गर्दी होताना दिसून येत आहे. परंतु, शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेची असताना महा-ई-सेवा केंद्रामार्फत अनधिकृतपणे बोगस अर्ज वाटप केले जात आहे.  त्याबाबतच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे प्राप्त झाल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी याबाबत तत्काळ चौकशीचे आदेश देत संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. लाभार्थ्यांकडून सध्या कोणत्याही प्रकारचे अर्ज भरून घेतले जात नसल्याचा खुलासा महापालिकेने केला असून, कुणी फसवणूक करत असल्यास त्याची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.