ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.योजना ही शेतकºयांना वृद्धावस्थेत फायद्याची ठरणार आहे. म्हातारपणी शेतकºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हातारपणसाठी शेतकºयांची कुठलीही ठोस बचत नसते. अशा शेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.त्यासाठी शासनाकडून पेंशन योजनेच्या माध्यमातून ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा तीन हजार रु पये पेन्शन मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील शेतकरी पत्र ठरू शकतात. वय मर्यादेनुसर दरमहा शुल्क भरणा करावा लागणार आहे. यासाठी ५० ते २०० रु पये पर्यंत मासिक हप्ता वयाच्या ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत शासनाच्या पेंशन फंडा मध्ये जमा करावा लागणार आहे.शेतकरी पती पत्नी स्वतंत्र पणे योजनेत सहभागी होऊ शकता. सेवानिवत्त तारखे पूर्वी शेतकºयांचे निधन झाल्यास पत्नीस दरमहा ५० टक्के मासिक पेशन मिळणार आहे.जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून प्रत्येक गावात सेतू कार्यालयात कृषी खात्यामार्फत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कृषी खात्याने सेतू कार्यालयात शेतकºयांचा माहितीसाठी कार्यशाळा ही घेण्यात आली. मात्र तरीही या योजनेला शेतकºयांचा अती अल्प प्रतिसाद आहे.प्रतिक्रि या....कृषी खात्याने या योजनेची भरपूर जाहिरात केली. शेतकर्यांना भविष्यात या योजनेचा चांगला फायदा होणार आहे. तरी शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नाही. तेव्हा जास्तीत जास्त शेतकºयांनी या योजनेचा लाभ घ्यावा.- अमोल वाघ. सी एस सी सेंटर, चालक.या योजनेसाठी वयोमर्यादा वाढवली पाहिजे. याला खाते फोड हा पर्याय आहे. त्याशिवाय योजनेत सहभागी होणे अवघड आहे.- हेमंत अहिरे. शेतकरी.
प्रधानमंत्री किसान पेंशन योजना शेतकऱ्यांची फिणविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:23 IST
ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
प्रधानमंत्री किसान पेंशन योजना शेतकऱ्यांची फिणविली पाठ
ठळक मुद्देशेतकºयांना त्यांच्या म्हातारपणात ही योजना संपूर्ण आरोग्य व समाधानी जीवन जगण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.