शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोबाइल संस्कृतीचा वापर कमी व्हावा प्रदीप पटवर्धन : पुरोहित एकांकिका स्पर्धेत पुण्याचे ‘आकार’ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:13 IST

नाशिकरोड : मोबाइल संस्कृतीचा कमी वापर करून एकांकिकेत काम करताना दिवसभरातील माणसांच्या वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी केले.

नाशिकरोड : मोबाइल संस्कृतीचा कमी वापर करून एकांकिकेत काम करताना दिवसभरातील माणसांच्या वागण्याचे निरीक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेता प्रदीप पटवर्धन यांनी केले. राज्यस्तरीय कै. वा. पुरोहित एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे येथील आकार या एकांकिकेने पटकावला.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कै. वा. पुरोहित एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी बोलताना पटवर्धन म्हणाले की, आई-वडील यांना सोडू नका ती तुमची सर्वांत मोठी संपत्ती आहे. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पटवर्धन यांनी दिली. तसेच पटवर्धन यांनी नाटकातील विनोदी संवाद सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी अध्यक्षपदावरून संस्थेचे कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर संस्थेचे सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, परीक्षक रमाकांत मुळे, देवदत्त पाठक, श्रुती चांदुरकर स्पर्धा प्रमुख हेमंत देशपांडे, सुधीर फडके उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरीय कै. वा. श्री. पुरोहित एकांकिका स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे येथील आकार या एकांकिकेला ४१ हजार रुपये रोख व चषक देण्यात आला. द्वितीय क्रमांक कोकमठाण येथील दांडगी मुले या एकांकिकेला ३५ हजार रुपये व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक- सांगली येथील फुलपाखरू या एकांकिकेला ३१ हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी बीना बनकर व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्राची सराफ, कामिनी पवार, पाहुण्यांचा व परीक्षकांचा परिचय वैशाली गोसावी, हेमंत देशपांडे यांनी करून दिला. आभार सुधीर फडके यांनी मानले. कार्यक्रमास संकुल प्रमुख वसंत जोशी, शाळा समिती अध्यक्ष जयंत मोंढे, प्राचार्य प्र. ला. ठोके, नरेंद्र ठाकरे, संजीवनी धामणे, ज्योती मोदियानी, सुरेश गायधनी, सुनील हिंगणे, सुरेश दीक्षित आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.पुरस्कार विजेतेवैयक्तिक स्त्री अभिनयामध्ये प्रथम - सानिका आपटे, द्वितीय-रविना सावंत, तृतीय- उत्तरा गायधनी, उत्तेजनार्थ- सिद्धी पाटील, केतकी भालवनकर, मृदुला चौघुले, वैयक्तिक पुरूष प्रथम- ओजस अत्तरदे, द्वितीय- रूचिका चव्हाण, तृतीय- अमित लोळगे, नेपथ्य प्रथम- चैतन्य थरकुडे, द्वितीय -प्रतिमा शिंदे, तृतीय- ज्योती पवार , संगीत योजना प्रथम- मनोहर म्हात्रे, द्वितीय- अभिजित केळकर, तृतीय- चैतन्य थरकुडे, वेशभूषा व रंगभूषा प्रथम- अनिकेत कालोखे, द्वितीय- ललित शिंदे तृतीय- मंगेश जाधव, दिग्दर्शन प्रथम- चैतन्य थरकुडे, द्वितीय- सुवर्णा निळे, तृतीय- राहुल जगताप, प्रकाश योजना प्रथम -चैतन्य थरकुडे, द्वितीय- प्रथमेश मानेकारी, तृतीय- मकरंद, मुकुंद यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.