लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्र. ६००३५) आॅपरेशन भुसावळ विभागात मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे.या इंजिनची मंगळवारी मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता पी. के. भंज, सहायक विभागीय अभियंता सुदीप रावत आदी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. डब्ल्यूएजी-१२ लोकोमोटिव्हजने नुकतीच भारतीय रेल्वेवर काम सुरू केले आहे. हे इंजिन रेल्वेवर उपलब्ध अत्याधुनिक चरण तंत्रज्ञानावर आधारित आहे.भारतीय रेल्वेवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या इंजिनपैकी १२००० अश्वशक्तीची क्षमता असलेले हे सर्वात शक्तिशाली इंजिन आहे. या इंजिनच्या उपयोगाने, मालवाहतूक करणाºया गाड्यांच्या विशेषत: भुसावळ विभागात धावणाºया कोळशाच्या मालगाड्यांच्या वेगात तसेच गुणात्मकदृष्ट्या लक्षणीय सुधारणा होणार आहे.
रेल्वेचे शक्तिशाली इंजिन भुसावळ विभागात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:20 IST
नाशिकरोड : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्र. ६००३५) आॅपरेशन भुसावळ विभागात मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे.
रेल्वेचे शक्तिशाली इंजिन भुसावळ विभागात दाखल
ठळक मुद्देहे इंजिन रेल्वेवर उपलब्ध अत्याधुनिक चरण तंत्रज्ञानावर आधारित आहे.